शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

वसुंधरा राजेंच्या पाठीशी भाजप

By admin | Updated: June 22, 2015 23:54 IST

सध्या फरार असलेले आयपीएल घोटाळ्यातील आरोपी ललित मोदी यांना व्हिसा मिळवून देण्यासाठी छुपी मदत केल्याच्या आरोपांमुळे अडचणीत आलेल्या

जयपूर : सध्या फरार असलेले आयपीएल घोटाळ्यातील आरोपी ललित मोदी यांना व्हिसा मिळवून देण्यासाठी छुपी मदत केल्याच्या आरोपांमुळे अडचणीत आलेल्या राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची सोमवारी भाजपप्रणीत केंद्र सरकारने जोरदार पाठराखण केली. वसुंधरा राजे यांच्या पाठीशी भाजप आणि केंद्र सरकार खंबीरपणे उभे आहे. पक्ष त्यांच्यासोबत होता, आजही आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले.ललित मोदीप्रकरणी गोत्यात आलेल्या राजेंच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. ललित मोदींनी वसुंधरा यांचे चिरंजीव दुष्यंत यांच्या एका कंपनीत २००८ मध्ये ११.६३ कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याच्या आरोपांमुळे त्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. अशा स्थितीत आतापर्यंत भाजपचा कुठलाही नेता स्पष्टपणे राजेंच्या समर्थनार्थ पुढे आला नव्हता; पण सोमवारी नितीन गडकरी एक दिवसाच्या दौऱ्यावर जयपूरला पोहोचले आणि राजेंच्या पाठीशी पक्ष आणि सरकार भक्कमपणे उभे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राजेंवरील आरोप निराधार आणि बिनबुडाचे आहेत. या प्रकरणात कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार झालेला नाही, असा दावाही गडकरींनी यावेळी केला.मुख्यमंत्री कार्यालयाने एक पत्रक जारी करून याबाबतची माहिती दिली. वसुंधरा राजे यांच्यावरील आरोप कुठल्याच दृष्टीने तर्कसंगत नाही. राजे यांचे चिरंजीव दुष्यंतवरील आरोपातही तथ्य नाही. कारण ती व्यावसायिक देवाण-घेवाण आहे आणि त्याचे आयकर रिटर्नही भरण्यात आले आहे. कुणाकडूनही कर्ज घेणे गुन्हा नाही. एका आर्थिक व्यवहाराला राजकीय वादाचे रूप देणे दुर्दैवी आहे. मग ते राजेंबाबत असो वा सुषमा स्वराज यांच्याबाबत असो, असे गडकरी यांनी म्हटले आहे. वसुंधरा राजे कायदेशीरदृष्ट्या, नैतिकदृष्ट्या आणि तार्किकदृष्ट्या आपल्या ठिकाणी योग्य आहेत. या प्रकरणात त्यांनी काहीही चूक केलेली नाही. कुठलाही भ्रष्टाचार वा गैरव्यवहार नाही. माझ्या मते, खोटे आरोप लावून अशाप्रकारे एखाद्याची प्रतिमा मलिन करण्याचे राजकारण कदापि योग्य नाही, असेही गडकरी म्हणाले. (वृत्तसंस्था)