तीन दिवसांत मिळणार जन्म-मृत्यू दाखले लोकसेवा हक्क लागू : पालिकेकडून अपिलीय अधिकारी नियुक्त
By admin | Updated: July 8, 2015 23:45 IST
नाशिक : नागरिकांना पारदर्शकपणे तत्पर सेवा पुरविण्यासाठी राज्यात लोकसेवा हक्क अध्यादेश लागू करण्यात आला असून त्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेकडून आता जन्म-मृत्यूसह विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र अवघ्या तीन दिवसांत उपलब्ध होणार आहे.
तीन दिवसांत मिळणार जन्म-मृत्यू दाखले लोकसेवा हक्क लागू : पालिकेकडून अपिलीय अधिकारी नियुक्त
नाशिक : नागरिकांना पारदर्शकपणे तत्पर सेवा पुरविण्यासाठी राज्यात लोकसेवा हक्क अध्यादेश लागू करण्यात आला असून त्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेकडून आता जन्म-मृत्यूसह विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र अवघ्या तीन दिवसांत उपलब्ध होणार आहे.महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश लागू झाल्यानंतर नाशिक महापालिकेने विविध सेवा-सुविधांसाठी नियत कालमर्यादा निश्चित करतानाच प्रथम व द्वितीय अपिलीय अधिकारीही नियुक्त केले आहेत. लोकसेवा हक्कानुसार नागरिकांना आता जन्म प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, मालमत्ता कर उतारा, थकबाकी नसल्याचा दाखला अर्ज केल्यानंतर अवघ्या तीन दिवसांत उपलब्ध होणार आहे. दस्तावेजाच्या मालमत्ता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देण्याचा कालावधी १५ दिवसांसाठी निश्चित करण्यात आला असून वारसा हक्काने मालमत्ता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देणे, जोते प्रमाणपत्र, नळजोडणी देणे, जलनि:सारण जोडणी देणे व अग्निशमनचा ना हरकत दाखला देण्याचा कालावधीही १५ दिवसांचा निश्चित करण्यात आला आहे. नागरिकांना झोन दाखला ७ दिवसांत तर भाग नकाशा ३ दिवसात मिळणार आहे तर बांधकाम परवाना ६० दिवसांत उपलब्ध करून दिला जाणार आहे. भोगवटा प्रमाणपत्र ३० दिवसांत मिळणार आहे. यासाठी महापालिकेने संबंधित खात्याच्या अधिकार्यांवर जबाबदारी निश्चित करताना प्रथम व द्वितीय अपिलीय अधिकारीही नियुक्त केले आहेत. नागरिकांना दिलेल्या मुदतीत सेवा न पुरविल्यास त्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम अपिलीय अधिकार्यांकडे सोपविण्यात आले आहे.