शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये माती घोटाळा? लालूंच्या मुलावर आरोप

By admin | Updated: April 4, 2017 20:44 IST

एकेकाळी चारा घोटाळ्यामुळे गाजलेल्या बिहारमध्ये आता माती घोटाळा झाल्याची चर्चा आहे. या घोटाळ्यात

ऑनलाइन लोकमत

पटना, दि. ४ -  एकेकाळी चारा घोटाळ्यामुळे गाजलेल्या बिहारमध्ये आता माती घोटाळा झाल्याची चर्चा आहे. या घोटाळ्यात लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यादव यांचा हात असल्याचा आरोप होत असून, राज्यातील भाजपाचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार मोदी यांनी ९० लाख रुपयांच्या या कथित घोटाळ्या प्रकरणी पर्यावरण मंत्री
 तेजप्रताप यादव यांना मंत्रिमंडळातून बरखास्त करण्यात यावे अशी मागणी मुख्यमंत्री नीतिश कुमार यांच्याकडे केली आहे. 
आज झालेल्या जनता दरभारानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सुशीलकुमार मोदी यांनी  ही मागणी केली. सुशिलकुमार मोदी यांनी आरोप केला की, संजय गांधी जैविक उद्यानाच्या सुशोभिकरणाच्या नावाखाली ९० लाख रुपयांची माती खरेदी करून पाऊलवाट तयार करण्याचे काम कोणत्याही प्रकारची निविदा न काढता रूपसपूर येथील एमअस इंटरप्रायझेसच्या वीरेंद्र यादव यांना देण्यात आले. 
 तेजप्रताप यांनी आपल्या एका कंपनीकडून पटण्यामध्ये बांधण्यात येत असलेल्या शॉपिंग मॉलच्या दोन अंडर ग्राऊंड फ्लोअरमधील माती आपल्याच मंत्रालयाला विकून ९० लाख रुपयांची कमाई केल्याचा आरोप करत मोदी यांनी कुठलाही मंत्री आपल्याच जमिनीतील माती आपल्या मंत्रालयाकडून कशी काय खरेदी करू शकतो, असा  सवाल केला. तसेच या कंपनीत तेजप्रताप हे निर्देशक असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. 
गेल्या दोन महिन्यांपासून रात्री १० ते ५ यावेळेत मातीची वाहतूक केली जात आहे. मात्र वन्य प्राण्यांच्या उद्यानात रात्रीच्या वेळी कोणत्याही प्रकारचे काम करण्यास मनाई असल्याचा आरोप मोदी यांनी केला.