शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

मोठी बातमी! 1 जानेवारीपासून UPI पेमेंटवर शुल्क आकारणी; फक्त एक अ‍ॅप वगळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2020 11:10 IST

UPI Rule Change From January 1 : थर्ड पार्टी अ‍ॅप प्रोव्हायडर्सवर ३० टक्के कॅप लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एसपीसीआयच्या या निर्णयामुळे आता UPI ट्रांझॅक्शनमध्ये आता कुठल्याही पेंमेंट अ‍ॅपची एकाधिकारशाही राहणार नाही.

नोटाबंदीनंतर सुरु झालेले व आजतागायत मोफत असलेले युपीआय ट्रान्झेक्शन आता महागात पडणार आहे. कारण नवीन वर्ष म्हणजेच १ जानेवारीपासून UPI पेमेंटवर शुल्क आकारले जाणार आहे. थर्ड पार्टी अॅपद्वारे जर कोणी युपीआय ट्रान्झेक्शन करणार असेल तर त्याला जादा चार्ज द्यावा लागणार आहे. 

नेशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआई) ने हा अतिरिक्त चार्ज लावण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर NPCI ने थर्ड पार्टी अ‍ॅप प्रोव्हायडर्सकडून चालवण्यात येणाऱ्या UPI  पेमेंट सर्व्हिसमध्ये १ जानेवारी २०२१ पासून ३० टक्के कॅप लावण्याचा निर्णय घेतला आहे. हा नियम लागू झाल्यानंतर गुगल पे, अ‍ॅमेझॉन पे, फोन पे सारख्या थर्ड पार्टी अ‍ॅप प्रोव्हायडर्सच्या ग्राहकांवर परिणाम होणार आहे. मात्र या नियमाचा परिणाम पेटीएमच्या ग्राहकांवर होणार नाही.

विदेशींवर भारतीय अ‍ॅप पडले भारी! PhonePe ने Google Pay ला मागे टाकले

युपीआय पैसे ट्रान्सफर करताना लावला जाणारा हा चार्ज पेटीएमला लागणार नाही. मात्र, फोनपे (Phonepe), गूगलपे (Google Pay), अॅमेझॉन पे (Amazon Pay) या पेमेंट अॅपवरून पैसे ट्रान्सफर केल्यास हे शुल्क आकारले जाणार आहे. 

या निर्णयाबाबत एनपीसीआयने सांगितले की, थर्ड पार्टी अ‍ॅप प्रोव्हायडर्सवर ३० टक्के कॅप लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एनपीसीआये हा निर्णय भविष्यात कुठल्याही थर्ड पार्टी अ‍ॅपची एकाधिकारशाही रोखण्यासाठी आणि त्याला आकाराच्या मनाने मिळणारे विशेष फायदे थांबवण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. एसपीसीआयच्या या निर्णयामुळे आता UPI ट्रांझॅक्शनमध्ये आता कुठल्याही पेंमेंट अ‍ॅपची एकाधिकारशाही राहणार नाही. ३० टक्के कॅप निर्धारित करण्यात आल्याने आता गुगल पे, अ‍ॅमेझॉन पे, फोनपे सारख्या कंपन्या यूपीआयअंतर्गत होणाऱ्या एकूण ट्रान्झॅक्शनमध्ये कमाल ३० टक्के ट्रान्झॅक्शनचीच तरतूद करू शकतील.

युपीआय म्हणजे काय? यूनिफाइड पेमेंट इंटरफेस/UPI एक रियल टाइम पेमेंट सिस्टिम आहे. ती मोबाईल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पैसे अकाऊंटमध्ये त्वरित ट्रान्सफर करू शकते. यूपीआयच्या माध्यमातून तुम्ही एका बँकेच्या अकाऊंटमधून त्वरित ट्रान्सफर करू शकता. यूपीआयच्या माध्यमातून तुम्ही एका बँक अकाऊंटला अनेक यूपीआय अ‍ॅपशी लिंक करू शकता. तर अनेक बँक अकाऊंटना एका यूपीआय अ‍ॅपच्या माध्यमातून नियंत्रित करू शकता.

टॅग्स :google payगुगल पेPaytmपे-टीएमbankबँकBanking Sectorबँकिंग क्षेत्रMONEYपैसा