शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

नोकरशाहीत मोठे खांदेपालट

By admin | Updated: June 2, 2015 23:34 IST

अनेक महिन्यांपासून नियुक्त्यांना उशीर होत असून फायलींचा ढीग वाढून निर्णय होत नसल्याच्या बातम्यांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सगळ्या रिक्त जागा भरत

हरीश गुप्ता, नवी दिल्लीअनेक महिन्यांपासून नियुक्त्यांना उशीर होत असून फायलींचा ढीग वाढून निर्णय होत नसल्याच्या बातम्यांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सगळ्या रिक्त जागा भरत आणल्या आहेत. मोदी यांनी सोमवारी मुख्य दक्षता आयुक्त आणि मुख्य माहिती आयुक्तांची नियुक्ती केल्यानंतर दुसऱ्या दिवशी १८ मंत्रालयांमध्ये प्रशासकीय पातळीवर खांदेपालट केले.त्यात नागरी उड्डयन, अन्न आणि ग्राहक व्यवहार, खाणी, सार्वजनिक उद्योग, जलस्रोत आणि गंगा शुद्धीकरण, खते, विदेश व्यवहार आणि अन्य खात्यांचा समावेश आहे. तथापि, सगळ्यात महत्त्वाचा बदल म्हणजे स्मृती इराणी यांच्या नेतृत्वाखालील मनुष्यबळ मंत्रालयातील दोन वरिष्ठ सचिवांना हलवणे. वृंदा स्वरूप व सत्यनारायण मोहंती हे शालेय शिक्षण विभागात सचिव होते. त्यांना तेथून हलविण्यात आले आहे. या दोघांचा गेल्या अनेक महिन्यांपासून स्मृती इराणींशी संघर्ष सुरू होता व त्या दोघांनीही या मंत्रालयातून बदली मागितली होती.वृंदा स्वरूप या वरिष्ठ आयएएस अधिकारी असून त्यांना बक्षीस म्हणून अन्न व सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव करण्यात आले आहे. सत्यनारायण मोहंती यांना राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे सरचिटणीस म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. सुभाषचंद्र खुंतिया आणि विनयशील ओबेरॉय यांना मनुष्यबळ विकास मंत्रालयात हलविण्यात आले आहे. ओबेरॉय हे १९७९ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी असून त्यांचेही महिला व बालविकास मंत्री मेनका गांधी यांच्याशी जमत नव्हते. ओबेरॉय यांनीही बदली मागितली होती. अनुज कुमार बिश्नाई हे जलस्रोत व गंगा शुद्धीकरण मंत्री उमा भारती यांच्या हाताखाली काम करीत होते. त्यांना खते विभागाचे सचिव करण्यात आले आहे. त्यांच्या जागी मोदी यांनी शशी शेखर यांची नियुक्ती केली आहे. मोदी यांच्यासाठी महत्त्व असलेल्या गंगा शुद्धीकरण प्रकल्पाच्या देखरेखीसाठी गेल्या १० महिन्यांत नियुक्त झालेले शशी शेखर हे तिसरे सचिव आहेत. थोडक्यात सांगायचे तर मोदी यांनी विविध मंत्रालये आणि विभागात गेल्या आठवड्यात जवळपास ५ डझन जागा भरल्या.