बिद्री दूधगंगा पुलावर संरक्षण पोल उभारले
By admin | Updated: May 12, 2014 16:40 IST
बोरवडे : कोल्हापूर - गारगोटी राज्यमार्गावर असणार्या बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा नदीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने संरक्षक पोल उभे केल्याने प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. उशिरा का असेना पण संबंधित विभागाने प्रवाशी वर्गाच्या संरक्षणाची जबाबदारी पूर्ण केल्याची प्रतिक्रिया लोकामधून व्यक्त होत आहे.
बिद्री दूधगंगा पुलावर संरक्षण पोल उभारले
बोरवडे : कोल्हापूर - गारगोटी राज्यमार्गावर असणार्या बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा नदीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने संरक्षक पोल उभे केल्याने प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. उशिरा का असेना पण संबंधित विभागाने प्रवाशी वर्गाच्या संरक्षणाची जबाबदारी पूर्ण केल्याची प्रतिक्रिया लोकामधून व्यक्त होत आहे.दूधगंगा नदीवरील नवीन पुलाच्या बांधकामाला २००६ च्या दरम्यान सुरवात झाली होती. परंतु नदीपरिसरातील शेतकरी व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यातील वादामुळे अनेक वर्षे बांधकाम रखडले होते. शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे व कोल्हापूर जिल्हा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी वेळोवेळी आंदोलनाच्या माध्यमातून बिद्री पुलाच्या पुर्ततेसाठी प्रयत्न केले होते. अखेर अनेक समस्यांचा अडथळा पार करीत गेल्या वर्षी हा पुल वाहतुकीसाठी खुला झाला होता.परंतु पुलाच्या दोन्ही बाजूस संरक्षक पोल उभा करण्याची मागणी गेली वर्षभर प्रवासी वर्गातून व्यक्त होत होती. अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन हे संरक्षक पोल उभा केल्याने प्रवाशी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.वार्ताहर चौकटबिद्री पुलाच्या पुर्ततेनंतर या ठिकाणी पुलाच्या मार्गावरून प्रवास करताना प्रवाशांसह पादचारी लोकांना त्रास सहन करावा लागत होता. समोरून वाहन आल्यानंतर साईडप्यावर थांबणे धोकादायक होते. त्यामुळे येथे संरक्षक पोलची गरज होती. यासाठी आम्ही अनेकवेळा मागणी केली होती. उशिरा का असेना या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने संरक्षक पोल उभा केल्याने वाहतुकीसाठी किंवा नदी परिसरात ये-जा करणार्या लोकांसाठी ही समाधानाची बाब आहे.बाळासाहेब पाटीलसंभाजी बिग्रेड, कोल्हापूर अध्यक्ष-----फोटो - बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा नदीवरील परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाने उभारलेले संरक्षक पोल.छाया : रमेश वारके, बोरवडे.