शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

‘भारतमाता की जय’ इस्लामविरोधी

By admin | Updated: April 2, 2016 08:19 IST

इस्लाममध्ये मूर्तिपूजा पूर्णपणे निषिद्ध आहे. ‘भारत माता की जय’ या उद्घोषणेत भारतमातेच्या मूर्तीचा जयघोष अपेक्षित असल्याने मुस्लिमांनी ‘भारत माता की जय’ म्हणणे इस्लामी धर्मशास्त्राला धरून होणार नाही.

लखनौ : इस्लाममध्ये मूर्तिपूजा पूर्णपणे निषिद्ध आहे. ‘भारत माता की जय’ या उद्घोषणेत भारतमातेच्या मूर्तीचा जयघोष अपेक्षित असल्याने मुस्लिमांनी ‘भारत माता की जय’ म्हणणे इस्लामी धर्मशास्त्राला धरून होणार नाही, असा फतवा देवबंद येथील दारुल उलूम या प्रतिष्ठित इस्लामी पाठशाळेने काढला आहे.दारुल उलूमच्या धर्मवेत्त्यांनी हा फतवा १९ मार्च रोजी काढला असला तरी गुरुवारी रात्री सोशल मीडियावर प्रसार झाल्याने त्याची माहिती सर्वदूर झाली. ‘भारत माता की जय’ म्हणणे किंवा न म्हणण्यावरून देशाच्या अनेक भागात अलीकडेच निर्माण झालेला वाद आणि संघ परिवाराने त्याची सांगड राष्ट्रवादाशी घातल्याच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक मुस्लिमांनी देवबंदच्या दारुल उलूमला पत्रे पाठवून याविषयी इस्लामी धर्मशास्त्र नेमके काय सांगते याचा खुलासा करण्याची विनंती केली होती. काहीजणांनी पत्रांसोबत भगव्या वस्त्रातील त्रिशूळधारी भारमातेची चित्रेही पाठविली होती. दारुल उलूमचे प्रवक्ते अश्रफ उस्मानी यांनी सांगितले की, आमच्या पाठशाळेत मौलाना हबीबुर्रहमान हैदराबादी यांच्या नेतृत्वाखाली इतर धर्मवेत्त्यांनी कुराण आणि हदीसच्या आधारे विचारविनिमय करून सामूहिक मत या फतव्याच्या रूपाने जारी केले आहे. या फतव्यात म्हटले आहे की, हिंदूंमधील काही लोक भारत या आपल्या देशाची ‘भारतमाते’च्या स्वरूपात देवीच्या रुपाने कल्पना करून तिचे पूजन करतात. इस्लामही स्वदेशावर प्रेम करण्यास शिकवितो, पण देशाला देव मानून त्याची भक्ती व पूजन करणे इस्लामला मान्य नाही. ‘भारतमाता की जय’ म्हणण्यास प्रतिबंध करणे हा देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्यांचा अपमान आहे. यावरून त्यांची मानसिकता दिसून येते. आपण पाकिस्तानात राहत नाही याची त्यांनी जाणीव ठेवावी. -साध्वी निरंजन ज्योती, केंद्रीय अन्नप्रक्रिया राज्यमंत्री