राज्यात सलग दुसर्या दिवशी भारनियमन
By admin | Updated: June 3, 2014 00:59 IST
पुणे : विद्युत संचातील तांत्रिक बिघाडामुळे राज्याला सलग दुसर्या दिवशी भारनियमनाला सामोरे जावे लागले. बिघाडामुळे वीजेची तुट निर्माण झाल्याने राज्यातील विविध ठिकाणी ३ ते सहा तासांचे भारनियमन करण्यात आले. पुणे व पिंपरी चिंचवडमधील ४३५ पैकी १६८ वाहिन्यांवर भारनियमन करण्यात आले.
राज्यात सलग दुसर्या दिवशी भारनियमन
पुणे : विद्युत संचातील तांत्रिक बिघाडामुळे राज्याला सलग दुसर्या दिवशी भारनियमनाला सामोरे जावे लागले. बिघाडामुळे वीजेची तुट निर्माण झाल्याने राज्यातील विविध ठिकाणी ३ ते सहा तासांचे भारनियमन करण्यात आले. पुणे व पिंपरी चिंचवडमधील ४३५ पैकी १६८ वाहिन्यांवर भारनियमन करण्यात आले. राज्यातील विद्युत संचातील बिघाड, गुजरात व मध्यप्रदेशातील बंद झालेले संच या मुळे विद्युत यंत्रणेची कंपनता (फ्रिक्वेन्सी) ४९.५ हर्टच्या दरम्यान होती. त्यामुळे राज्यात भारनियमन करावे लागल्याची माहिती महावितरणच्या अधिकार्यांनी दिली. दरम्यान वीजेची गरज भागविण्यासाठी महावितरणने विविध स्त्रोतांकडे मागणी केली आहे. रविवारी अदानी प्रकल्पातील १ हजार ३२० मेगा वॉट, इंडिया बुल्स ५५, जेएसडब्लू ६०० व केंद्रीय प्रकल्पातील ५०० मेगावॅटचे संच अचानक बंद पडले आहेत. त्यामुळे राज्यात ३ हजार मेगावॉटची तुट निर्माण झाली आहे. राज्यातील वीज पुरवठा सुरळीत रहावा यासाठी महावितरणने केंद्रीय पॉवर ग्रीड मधून सुमारे १ हजार २०० मेगावॉट, तसेच अल्पकालीन वीज खरेदीद्वारे २८५ मेगावॉट वीज घेण्यात आली आहे. इंडिया बुल्सचा २७० व परळीचा २१० मेगावॉटचा संच सुरु झाला आहे. मात्र तरीही २ हजार मेगावॉटची तुट असल्याने भारनियमन करावे लागत आहे. मंगळवारी (दि.३) अदानी प्रकल्पाचा ६६० मेगावॉटचा संच सुरु होणे अपेक्षित आहे. तसेच एक्सचेंजमधून देखील अधिक वीज खरेदीसाठी प्रयत्न करण्यात येत आहे. ग्राहकांची भारनियमनातून सुटका करण्यासाठी महावितरण प्रयत्नशील आहे. या काळात ग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार देशात पावसाच्या सरासरीत काहीशी तुट दाखविण्यात आली आहे. यंदा पाऊस लांबल्यास आपत्कालिन परिस्थितीत वीज पुरवठा करता यावा यासाठी कोयना धरणातील पाणीसाठा राखून ठेवण्यात आला असल्याचे महावितरणने स्पष्ट केले.