शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
4
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
5
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
6
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
7
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
8
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
9
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
10
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
11
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
12
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
13
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
14
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
15
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
16
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
17
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
18
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
19
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
20
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
Daily Top 2Weekly Top 5

घरात शौचालय नसल्यास नाही मिळणार भाजी - मध्य प्रदेशातील अनोखा उपक्रम

By admin | Updated: March 16, 2016 10:46 IST

मध्य प्रदेशातील रतलाममधील एका गावातील नागरिकांनी उघड्यावर शौचास जाणा-यांना दैनंदिन गरजेच्या वस्तू वा सुविधा देणे बंद केले आहे.

ऑनलाइन लोकमत

भोपाळ, दि. १६ - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाचा परिणाम हळूहळू संपूर्ण देशभरात, गावा-गावात जाणवायला लागला आहे. मध्य प्रदेशातील रतलाममधील एका गावातील नागरिकांनी तर उघड्यावर शौचास जाणा-यांना दैनंदिन गरजेच्या वस्तू वा सुविधा देणे बंद केले आहे. रतलामच्या भुटेडा गावात ज्यांच्या घरात शौचालय नसेल वा जे उघड्यावर शौच करण्यास जात असतील अशा लोकांना गावातील व्यावसायिकांनी भाजी विकणे, केस कापणे अशा सेवा देण्यास नकार दिला आहे. 
काही दिवसांपूर्वी मी 'स्वच्छ भारत अभियान' मोहिमेच्या एका सत्रात सहभागी झालो होतो. उघड्यावर शौचाला जाणे ही फक्त वाईट सवय नसून त्यामुळे आरोग्यावरही वाईट परिणाम होतो, हे मी गावक-यांना समजावून सांगितले. त्यानंतर गावक-यांनी स्वत:हून पुढाकार घेत अनेक योजना राबवण्याचा विचार सुरू केला' असे या कल्पनेचा जनक असलेल्या लोकेश शर्माने सांगितले. त्याची ही कल्पना पटून अनेक  गावक-यांनी त्याची साथ दिली ज्यामध्ये धीरूभाई हे भाजी विक्रेते आणि गावातील एकमेव न्हावी अमरू लाल सेन यांचा समावेश आहे. 
त्यानुसार ' उघड्यावर शौचाला जाणारी एखादी व्यक्ती माझ्या दुकानात आल्यास मी त्याची दाढी करण्यास वा त्याच्या कुटुंबियांचे केस कापून देण्यास नम्रपणे पम स्पष्ट शब्दांत नकार देतो' असे अमरू लाल सेन यांनी सांगितले. ' मात्र मी त्या नागरिकातची समजूत काढतो आणि त्याने घरात शौचालय बांधून त्याचा उपयोग करण्यास सुरूवात केल्यास तो माझ्या दुकानात आल्यावर मी त्याला एकदा मोफत सेवा देईन अशी ऑफर त्याला देतो' असेही त्यांनी नमूद केले.