शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव दुचाकीने घेतला पाटबंधारे कर्मचार्‍याचा बळी काव्यरत्नावली चौकातील घटना: दोन दिवसापासून सुरू होती मृत्यूशी झुंज

By admin | Updated: October 30, 2016 00:18 IST

जळगाव : रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीने उडविल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या प्रल्हाद न्हानू श्रीखंडे (वय ५३ मूळ रा.चिंचोल, ता.मुक्ताईनगर ह.मु.गिरणा कॉलनी, जळगाव) यांचा शनिवारी दुपारी साडे तीन वाजता उपचार सुरू असताना मृत्यू झाला. श्रीखंडे हे पाटबंधारे विभागात नोकरीला होते.

जळगाव : रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीने उडविल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या प्रल्हाद न्हानू श्रीखंडे (वय ५३ मूळ रा.चिंचोल, ता.मुक्ताईनगर ह.मु.गिरणा कॉलनी, जळगाव) यांचा शनिवारी दुपारी साडे तीन वाजता उपचार सुरू असताना मृत्यू झाला. श्रीखंडे हे पाटबंधारे विभागात नोकरीला होते.
श्रीखंडे हे गुरुवारी संध्याकाळी ड्युटीवरून आल्यानंतर काव्यरत्नावली चौक परिसरात फिरायला गेले असता साडे सात वाजता रस्ता ओलांडत असताना महाबळ कॉलनीकडून काव्यरत्नावली चौकाकडे दुचाकीने (क्र.एम.एच.१९ सी.एल ४२५७) भरधाव वेगाने येणार्‍या बिलाल हुसेन पिंजारी (रा.समता नगर, जळगाव) याने जोरदार धडक दिली. त्यात ते लांब फेकले जाऊन उजव्या पायास व डोक्यात जबर मार बसला. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथे दोन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर शनिवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. श्रीखंडे यांच्या मृत्यूची माहिती मिळताच पाटबंधारे विभागाचे तत्कालीन अधीक्षक तथा नागपूर विभागाचे माहिती आयुक्त व्ही.डी.पाटील यांच्यासह अधिकार्‍यांनी रुग्णालयात धाव घेतली.
मूळ गावी अंत्यसंस्कार
मृतदेह खासगी रुग्णालयातून सरकारी रुग्णालयात आणण्यात आला. शवविच्छेदन झाल्यानंतर संध्याकाळी त्यांच्या मूळ गावी चिंचोल येथे नेऊन तेथे अंत्यसंस्कार करण्यात आले. श्रीखंडे यांच्या प›ात पत्नी,दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. मुलगी विवाहित असून मुंबई येथे वास्तव्याला आहे. दरम्यान, या अपघातप्रकरणी दुचाकीस्वाराविरुध्द रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुसाट वाहने उठली जिवावर
शहरात भरधाव वेगाने दुचाकी व चार चाकी चालविण्याचे प्रकार वाढले आहेत. महाबळ रोड व रिंग रोड या दोन रस्त्यावर हा प्रकार जास्त चालतो. रात्री दहा वाजेनंतर तर बड्या घराण्यातील मुले मद्याच्या नशेत वाहन चालवतांना पोलिसांनी पकडले आहेत. दोन दिवसापूर्वीच एका तरुणाची दुचाकी जप्त करून त्याच्या पालकांसह पोलीव अधीक्षक यांच्या समोर हजर करण्यात आले होते. मुजोर तरुणांची हौस असली तरी त्यात निष्पाप नागरिकांचा जीव जात आहे. श्रीखंडे हे त्याचाच बळी ठरले आहेत.