शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक यांना उत्कृष्ट पर्यटन विकासाचे पुरस्कार

By admin | Updated: July 31, 2016 05:31 IST

सर्वोत्कृष्ट पर्यटन विकासाचा २0१४-१५च्या पहिला पुरस्कार मध्य प्रदेश राज्याला मिळाला

नवी दिल्ली : सर्वोत्कृष्ट पर्यटन विकासाचा २0१४-१५च्या पहिला पुरस्कार मध्य प्रदेश राज्याला मिळाला असून, दुसऱ्या क्रमांकावर गुजरात आणि तिसऱ्या क्रमांकावर कर्नाटक आहे. केंद्रीय पर्यटन मंत्रालयातर्फे झालेल्या राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार सोहळ्यात लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या हस्ते शनिवारी हे पुरस्कार देण्यात आले. महाराष्ट्राला एकही पुरस्कार नसला तरी मुंबईच्या सहार येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला सर्वोत्कृष्ट विमानतळाचा पर्यटन पुरस्कार मिळाला आहे.राजस्थानातील सवाई माधोपूर स्थानकाची सर्वोत्कृष्ट पर्यटनस्नेही रेल्वे स्थानक म्हणून निवड झाली, तर तेलंगणामधील वारांगळची उत्कृष्ट हेरिटेज शहर म्हणून निवड झाली. मध्य प्रदेशला अमरकंटक या धार्मिक शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे उत्कृष्ट जतन केल्याबद्दलचा पुरस्कार देण्यात आला आहे.यंदाच्या पुरस्कारांमध्ये पर्यटन कंपन्या तसेच अनेक हॉटेल्स यांचीही निवड करण्यात आली आणि त्यांनाही पुरस्कार देण्यात आले. हॉटेलांमध्ये ताज एक्झोटिका (गोवा), फतेह प्रकाश पॅलेस (उदयपूर), कोकोनट कागून (कोट्टायम) आणि गजानन पॅलेस (बिकानेर) यांचा समावेश आहे. दिव्यांग पर्यटकांना उत्कृष्ट सेवा पुरविल्याबद्दल दिल्लीच्या ललितची निवड करण्यात आली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)>पर्यटन व्यवसायाला प्रोत्साहन देण्याचे मोदी सरकारचे धोरण असल्याचे या वेळी केंद्रीय पर्यटनमंत्री महेश शर्मा यांनी सांगितले. पर्यटन व्यवसायातून देशात हजारो रोजगार उपलब्ध होतील आणि मोठ्या प्रमाणात परकीय चलनही भारताला मिळेल, असेही ते म्हणाले. >किमान १ टक्का पर्यटक यावेत : जगभरात पर्यटनासाठी जितके पर्यटक जातात, त्यापैकी १ टक्काही पर्यटक भारतात येत नाहीत. त्यामुळे पर्यटन व्यवसायाच्या वाढीला भारतात खूप मोठा वाव आहे. त्यामुळे २0२0पर्यंत भारतात किमान १ टक्का पर्यटक यावेत आणि २0२५पर्यंत हे प्रमाण २ टक्के असावे, असे केंद्राचे प्रयत्न आहेत, असे पर्यटनमंत्र्यांनी नमूद केले. गेल्या वर्षी जानेवारी ते जून या काळात भारतात आलेल्या परदेशी पर्यटकांच्या तुलनेत यंदा याच काळात सुमारे ९ टक्क्यांनी वाढ झाली. यंदा ४१ लाख ८६ हजार परदेशी पर्यटक भारतात आले.>परकीय चलन : गेल्या वर्षीपेक्षा पर्यटकांमुळे परकीय चलनात यंदा १४.१% वाढ झाली. यंदा जूनपर्यंत ७३,0६५ कोटी रुपये परकीय चलन मिळाले, असे महेश शर्मा म्हणाले.