शालेय विद्यार्थ्यांची बेस्ट पासची भाडेवाढ रद्द
By admin | Updated: August 7, 2015 00:06 IST
शालेय विद्यार्थ्यांची बेस्ट पासची भाडेवाढ रद्द
शालेय विद्यार्थ्यांची बेस्ट पासची भाडेवाढ रद्द
शालेय विद्यार्थ्यांची बेस्ट पासची भाडेवाढ रद्दमहापालिका महासभेत प्रस्ताव मंजूरमुंबई: बेस्टने एप्रिल महिन्यात शालेय विद्यार्थ्यांची बस पास भाडेवाढ महापालिकेने गुरुवारी सभागृहात रद्द केली. महापालिका सभागृहात यासंबधीचा प्रस्ताव मंजुर करण्यात आला आहे. या मंजुरीचा सुमारे १ लाख ३० हजार विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे, अशी माहिती बेस्ट समितीचे अध्यक्ष अरुण दुधवडकर यांनी दिली.बेस्टने एप्रिल महिन्यात बेस्टच्या तिकिट आणि पास भाड्यात वाढ केली होती. या अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांच्या पास भाड्यातही वाढ करण्यात आली होती. या भाडेवाढीवर सर्वच स्तरातून टिका होऊ लागली. परिणामी अरुण दुधवडकर यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या बस पासचे भाडे रद्द करण्याबाबतचा ठराव सभागृहात मांडला. यावर जुनेच भाडे आकारण्यात यावी, अशी सूचना सभागृहनेत्या तृष्णा विश्वासराव यांनी मांडली. शिवाय महापौर स्नेहल आंबेकर यांनीही या प्रस्तावाला मंजुरी दिली. ही दरवाढ रद्द केल्याने बेस्टला दरवर्षी ५ ते ६ कोटींचा भुर्दंड बसणार आहे. (प्रतिनिधी)..............................