ग्राहक बनून व्यापार्यास लुटले औराद येथील घटना : ७५ हजार रुपये पळविले
By admin | Updated: February 14, 2015 23:50 IST
औराद शहाजानी : मक्याच्या बियाणाचे भाव विचारुन एका अज्ञात चोरट्याने ७५ हजार रुपयांची बॅग पळविल्याची घटना औराद शहाजानी येथे घडली़ याप्रकरणी औराद पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
ग्राहक बनून व्यापार्यास लुटले औराद येथील घटना : ७५ हजार रुपये पळविले
औराद शहाजानी : मक्याच्या बियाणाचे भाव विचारुन एका अज्ञात चोरट्याने ७५ हजार रुपयांची बॅग पळविल्याची घटना औराद शहाजानी येथे घडली़ याप्रकरणी औराद पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़येथील प्रेमनारायण भगीरथ सोनी यांचे गावातील मुख्य रस्त्यावर भगीरथ ॲग्रो एजन्सी नावाचे दुकान आहे़ गुरुवारी या दुकात एक अज्ञात व्यक्ती आला़ त्याने मक्याच्या बियाणाचे भाव काय असे विचारले़ दरम्यान, अज्ञात व्यक्तीने एक हजार रुपयांची नोट काढून सुटे मागितले़ त्यामुळे दुकानमालक सोनी यांनी सुटे पैसे देण्यासाठी बॅग काढली़ बॅगेतील पाचशेच्या दोन नोटा देत असताना दुकानाबाहेर ट्रकमधून त्यांचा माल आला़ त्यामुळे ते ट्रक साईडला लावण्यासाठी बोलत दुकानाबाहेर पडले़ दरम्यान, अज्ञात व्यक्तीने दुकानात ठेवलेली ७५ हजार रुपयांची बॅग पळविली़ याप्रकरणी सोनी यांच्या फिर्यादीवरुन औराद पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक भद्रे करीत आहेत़