ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. १२ - लोकसभा निवडणुकीच्या नवव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली असून या टप्प्यात जवळपास ९ कोटी मतदार ६,०६० उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचा निर्णय करणार आहेत. दुपारी ११ वाजेपर्यंत पश्चिम बंगालमध्ये २६ टक्के, बिहारमध्ये २१ टक्के तर उत्तर प्रदेशमध्ये ११ टक्के मतदान झाले आहे. प्रतिष्ठेची लढत मानल्या गेलेल्या वाराणशीत भाजपाचे नरेंद्र मोदी व ‘आप’चे अरविंद केजरीवाल आणि अजय राय यांच्या रूपात काँग्रेसचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
आज उत्तर प्रदेशच्या १८, पश्चिम बंगालच्या १७ व बिहारच्या ६ जागांसाठी मतदान होत असून मुलायमसिंह, जगदंबिका पाल, योगी आदित्यनाथ इत्यादी प्रमुख उमेदवार यासाठी रिंगणात आहेत.
असे आहेत मतदारसंघ
> बिहार : वाल्मिकीनगर, पश्चिम चंपारण, पूर्वी चंपारण, वैशाली, गोपालगंज, सिवन
90 उमेदवार 8582 केंद्र 9051952 एकुण मतदार
> उत्तर प्रदेश : डूमारियागंज, महाराजगंज, गोरखपूर, कुशीनगर, देवारिया, बासगांव, लालगंज, आजमगढ, घोसी, सलामपूर, बलिया, जौनपूर, मछलीशहर, गाझियापूर, चंदौली, वाराणसी, मिर्झापूर, रॉबर्टगंज
328 उमेदवार 19881 केंद्र 03 मतदार
> पश्चिम बंगाल : बेहरामपूर, कृष्णनगर, रानाघाट, बानगाव, बैराकपूर, दम दम, बरासात, बसरिहात, जयनगर, मथुरापूर, डायमंड हार्बर, जाधवपूर, कोलकाता दक्षिण, कोलकाता उत्तर, तामलुक, कांटाई, घाटल
188 उमेदवार 32000 केंद्र 12247765 एकूण मतदार
प्रमुख लढती
> उत्तर प्रदेश : जौनपूर : अभिनेता रविकिशन (काँग्रेस), कुशीनगर : आर. पी. एन सिंग (काँग्रेस), डोमारीगंज : जगदंबिका पाल (भाजपा), बलिया : नीरज शेखर (सपा, माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचे पुत्र), मिर्जापूर : सुप्रिया पटेल (अपना दल, भाजपा सहयोगी पक्षाच्या अध्यक्षा), घोसी : मुख्तान अन्सारी (कौमी एकता दल, काँग्रेस सहयोगी पक्ष) विरुध्द अतुल कुमार अनजान (कम्युनिस्ट पक्ष), देवरिया : कलराज मिश्र (भाजपा), गोरखपूर : योगी आदित्यनाथ, गाझियापूर : विकास यादव (अपक्ष, बसपाचे माजी खासदार डी. पी. यादव यांचा मुलगा)
बिहार : प. चंपारण : प्रकाश झा (संजद) विरुध्द रघुनाथ झा (राजद), वैशाली : रघुवंश प्रसाद सिंह (राजद) विरुध्द रामा सिंग (लोजप) विरुध्द विजय कुमार साहनी (संजद), सिवन : हेना शहाब (राजद, खा. मोहम्मद शहाबुद्दीन यांच्या पत्नी)
पश्चिम बंगाल : बारासात : पी. सी. सरकार ज्यूनियर (भाजपा, जादूगार) विरुध्द अधीर रंजन चौधरी (प्रदेश काँग्रेस अध्यक्ष) विरुध्द डॉ. मूर्तजा हुसेन (डावी आघाडी), जाधवपूर : सुगाता बोस (तृणमूल काँग्रेस, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नात), बैरकपूर : दिनेश त्रिवेदी (तृणमूल काँग्रेस, माजी रेल्वे मंत्री) विरुध्द रमेश हांडा (भाजपा, माजी आयपीएस अधिकारी), दम दम : असीम दासगुप्ता (माकप, माजी अर्थमंत्री) विरुध्द तपन सिकदर (भाजपा, माजी केंद्रीय मंत्री) विरुध्द सौगत राय (तृणमूल काँग्रेस). कोलकाता दक्षिण : संदीप बंदोपाध्याय (तृणमूल काँग्रेस, प्रदेश अध्यक्ष), घाटल : दीपक अधिकारी-देव (तृणमूल काँग्रेस, अभिनेता), कृष्णानगर : तापस पॉल, (तृणमूल, अभिनेता), बराकपूर : अभिषेक बॅनर्जी (तृणमूल, ममता बॅनर्जी यांचे पुतणे ) विरुध्द सुभासिनी अली (माकपा नेत्या).
दरम्यान उत्तर प्रदेशातील चंदौली येथील मतदान केंद्रामध्ये मुलायम सिंग यादव व अखिलेश या दोघांचे फोटो असलेला लॅपटॉप आढळल्याने एक नवा वाद निर्माण झाला आहे. समाजवादी पक्षाच्या सरकारने विद्यार्थ्यांना लॅपटॉप वाटले होते, त्यापैकीच एक निवडणूकीच्या कामासाठी वापरण्यात आल्याने त्यावर जोरदार आक्षेप घेण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने याप्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.