शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

मेघालयात भाजप नेत्याची बीफ पार्टी

By admin | Updated: June 2, 2017 00:41 IST

केंद्रातील मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल मेघालयातील भाजप नेत्याने बीफ पार्टी आयोजित करण्याचे ठरविले

शिलाँग : केंद्रातील मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल मेघालयातील भाजप नेत्याने बीफ पार्टी आयोजित करण्याचे ठरविले असून, आता पक्ष त्याबाबत काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.ईशान्येकडील राज्यांमध्ये बीफ सर्रास खाल्ले जाते. तेथील राज्यांचा बीफबंदीला विरोध आहे. त्यामुळे भाजपचे मेघालयातील नेते बाचू चाम्बुगाँग माराक यांनी मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण होत असल्याने बीफ पार्टी देण्याची घोषणा केली आहे. माराक हे उत्तर गारो हिल्स जिल्हा भाजपचे अध्यक्ष आहे. त्यांनी फेसबुकवर आपण बीफ आणि बिची पार्टी देणार असल्याचे म्हटले आहे. मेघालयात तांदळापासून तयार करण्यात येणारी दारू बिची नावाने ओळखली जाते. बीफ आमच्या नेहमीच्या जेवणातील खाद्यपदार्थ आहे. आमचे जेवण बीफशिवाय पूर्णच होऊ शकत नाही, असे माराक यांचे म्हणणे आहे. बीफवर बंदी घालणे अयोग्य आहे, असे सांगतानाच, बीफवर बंदी घातली, तर आपण पक्ष सोडू, असा इशाराही त्यांनी दिला आहे. बीफवर बंदी घातल्यास भाजपला गारो हिल्समध्ये आणि एकूणच मेघालयात विरोध होईल, कोणीही भाजपला पाठिंबा देणार नाही, असे सांगून ते म्हणाले की, भाजप बीफबंदी करील, असे आम्हाला वाटत नाही. (वृत्तसंस्था)बाचू यांना नारळ?बीफ पार्टीच्या घोषणेनंतर बाचू चाम्बुगाँग माराक यांना पक्षातून काढण्याचा विचार सुरू आहे. भाजपचे ईशान्येकडील राज्यांचे प्रभारी नलीन कोहली यांनी माराक यांना पक्षातून निलंबित करण्यात येईल, असे सूचित केले आहे. मेघालयात पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत बीफबंदी हा भाजपला अडचणीचा मुद्दा ठरू शकेल. कत्तलीसाठी गुरांच्या विक्रीवर बंदी घालण्याच्या अधिसूचनेनंतर पश्चिम गारो हिल्स जिल्हा भाजपचे अध्यक्ष बर्नार्ड एन मारक यांनी राजीनामा दिला आहे.हा विषय तरराज्यांचा : कोहलीनवी दिल्ली : स्थानिक लोकांच्या खाण्या-पिण्याच्या सवयी लक्षात घेऊ न संबंधित सरकारांनी बीफबंदीविषयी वा एकूणच गुरांच्या कत्तलीविषयी निर्णय घ्यावा, असे सांगत, या वादातून भाजपची सुटका करण्याचा प्रयत्नही नलीन कोहली यांनी केला.