शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

बरखा दत्त यांची 21 वर्षांनंतर एनडीटीव्हीला सोडचिठ्ठी

By admin | Updated: January 16, 2017 08:21 IST

ज्येष्ठ पत्रकार बरखा दत्त यांनी एनडीटीव्हीमधून राजीनामा दिला आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 16 - ज्येष्ठ पत्रकार बरखा दत्त यांनी एनडीटीव्हीमधून राजीनामा दिला आहे. बरखा दत्त या एनडीटीव्हीमध्ये सल्लागार संपादक या पदावर कार्यरत होत्या. रिपोर्टनुसार, त्या स्वतःचा नवा व्हेंचर सुरू करण्याच्या तयारीत आहेत. बरखा दत्त यांनी राजीनामा दिल्यानंतर एनडीटीव्हीनं एक अधिकृत निवेदन प्रसिद्ध केलं आहे. या निवेदनात वाहिनीसाठी त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करत भविष्यातील पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. 1995ला कॉलेजमधून पासआऊट झाल्यानंतर बरखा दत्त या थेट एनडीटीव्हीमध्ये रुजू झाल्या. 21 वर्षं वाहिनीसाठी काम केल्यानंतर बरखा दत्त यांनी अपील करून नव्या संधीच्या शोधात असून, स्वतःच्या व्हेंचरसाठी काम करण्याची इच्छा असल्याचं सांगितलं आहे. एनडीटीव्हीच्या कार्यकाळात त्यांनी फार प्रगती केली. भारतासोबत त्या अनेक देशांमध्ये प्रसिद्ध झाल्या. तसेच त्यांनी बरेच पुरस्कार देखील प्राप्त केले आहेत. आम्हाला विश्वास आहे की बरखा आणखी प्रगती करेल, एनडीटीव्ही त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा देत आहे, असं निवेदनात म्हटलं आहे. (अर्णब गोस्वामींचा टाइम्स नाऊला टाटा)(अर्णब गोस्वामी पत्रकार आहे का ? - बरखा दत्त)बरखा दत्त यांनी 1999मध्ये झालेल्या कारगिल युद्धात केलेल्या कव्हरेजमुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या होत्या. त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले असून, त्यांना पद्मश्रीनंही गौरवण्यात आलं आहे. मात्र त्यांच्यावर काही प्रकरणातून टीकाही करण्यात आली होती. राडिया टेप प्रकरणात त्यांचं नाव जास्त गाजलं होतं. बरखा दत्त यांनी राजीनामा दिल्यानंतर ट्विटरवर त्यांचं ट्रेंडिंग सुरू आहे. ट्विटरवरून त्यांच्या फॉलोव्हर्सच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी त्यांच्यावर टीका केली आहे. तर काहींनी त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी अर्णब गोस्वामी यांनी असाच राजीनामा दिला होता. त्यावेळीही गोस्वामी ट्रेंडिंगमध्ये होते.