पनामाने आणली केळी निर्यातीची संधी जागतिक उत्पादनात घट : जिल्ातील केळीला सुगीचे दिवस शक्य
By admin | Updated: June 9, 2016 22:42 IST
जळगाव : पनामा रोगामुळे जागतिक पातळीवर केळीचे उत्पादन सात दशलक्ष टनने घटले आहे. उत्पादनात आघाडीवर असलेल्या फिलीपीन्स, कोलंबिया, कोस्टारिका, पनामा, निकाराग्वा या देशांमध्ये पनामा रोगाचे संकट भीषण होत असल्याने राज्यातील पर्यायाने जिल्ातील केळी निर्यातीला मोठी संधी आहे.
पनामाने आणली केळी निर्यातीची संधी जागतिक उत्पादनात घट : जिल्ातील केळीला सुगीचे दिवस शक्य
जळगाव : पनामा रोगामुळे जागतिक पातळीवर केळीचे उत्पादन सात दशलक्ष टनने घटले आहे. उत्पादनात आघाडीवर असलेल्या फिलीपीन्स, कोलंबिया, कोस्टारिका, पनामा, निकाराग्वा या देशांमध्ये पनामा रोगाचे संकट भीषण होत असल्याने राज्यातील पर्यायाने जिल्ातील केळी निर्यातीला मोठी संधी आहे. देशात केळीची सर्वाधिक ८२ हजार हेक्टर लागवड राज्यात तर राज्यात सर्वाधिक ५२ हजार हेक्टर लागवड जिल्ात होते. यातच जिल्ात ग्रॅँड नैन जातीचा केळीचा वाण अधिक क्षेत्रावर लागवड होऊ लागला आहेे. त्यामुळे जिल्ाची तसेच नंदुरबार, सोलापूर, सांगली या जिल्ांची केळी उत्पादकता ६ हेक्टरी ६० मे.टनवर पोहोचली आहे. दुसर्या बाजूला फिलीपीन्स, होंदूरस, इक्वेडोर, कोलंबिया, कोस्टारिका या देशांची उत्पादकता मात्र हेक्टरी ४० मे.टन पर्यंत आहे. पनामा रोगाचे थैमान या देशांमध्ये सुरू असल्याने केळीचे जागतिक उत्पादन ११२ दशलक्ष मे.टनवरून ९५.१४ दशलक्ष टनवर आले आहे. करपा रोगामुळे तर फिलीपीन्सचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. इरान, दुबई, बहरीन, युएई, सौदी, ओमान, इराक या देशांमध्ये दर आठवड्याला २५० कंटेनर केळीची गरज असते. फिलीपीन्स, इक्वेडोर येथून हे देश केळी मागवितात. तर चीनला दर आठवड्याला १२५ कंटेनर केळीची गरज असते. हाँगकाँग, जपान, कोरियामध्येही केळीची मागणी वाढली आहे. दुसर्या बाजूला चीनमध्ये थंड वातावरणात केळी खराब होत आहे. तर फिलीपीन्स, इक्वेडोरमध्ये पनामा रोगामुळे केळीचा तुटवडा आहे. चीनमध्ये फिलीपीन्स, इक्वेडोरमधून केळीचा पुरवठा होतो, पण तुटवड्यामुळे मागणी व पुरवठा हे समीकरण कुठलाही देश पूर्ण करू शकत नाही. त्यामुुळे आखाती राष्ट्रांमध्ये महाराष्ट्रातून पर्यायाने जिल्ह्यातून केळी निर्याती संधी आहे. निर्यातीसाठी आवश्यक असलेल्या गॅॅँ्रड नैन या जातीच्या केळीची लांबी ९ इंच, केळीची गोलाई ४२ कॅलीपर आहे. आकर्षक रंग, केळी सरळ असणे आदी कारणांमध्ये तिला परदेशातून मागणी आहे. जिल्ात ग्र्रँड नैनची रोपे व रोपांमधून काढलेल्या खोडांखालील (कंद) क्षेत्र सर्वाधिक आहे. त्याचा लाभ केळी निर्यातीसाठी होऊ शकतो. शिवाय जिल्ातील केळीचे सिंचन सूक्ष्मसिंचनाने होते. त्याचा लाभ केळीचा दर्जा सुधारण्यासह पाणी बचतीसाठीही झाला आहे. निर्यातीसाठी सुविधांची गरजजिल्ातील केळीला निर्यातीसाठी मागणी आहे, पण त्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. २५ वर्षात केळीची उत्पादकता अडीच पट वाढली.