शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

कळंगुट येथील क्रिकेटर्स रेस्टॉरंटवर बंदी

By admin | Updated: December 25, 2015 02:57 IST

- स्थानिकांच्या तक्रारीमुळे उपजिल्हाधिकार्‍यांनी दिला आदेश

- स्थानिकांच्या तक्रारीमुळे उपजिल्हाधिकार्‍यांनी दिला आदेश
म्हापसा : नायकावाडो-कळंगुट येथील क्रिकेटर्स बार अँण्ड रेस्टॉरंट फेब्रुवारी 2016 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश बार्देश तालुक्याचे उपजिल्हाधिकारी पुंडलिक खोर्जुवेकर यांनी गुरुवारी दिले आहेत.
पर्वरी पोलीस स्थानकाच्या उपअधीक्षकांनी प्रकरणाची चौकशी केल्यानंतर त्यांना सादर केलेल्या अहवालाच्या आधारावर हे आदेश देण्यात आले. बुधवारी रात्री कांदोळी व कळंगुट भागातील सुमारे 50 जणांच्या जमावाने या रेस्टॉरंटमुळे स्थानिकांना त्रास होत असल्याची तक्रार करून ते बंद करण्याची मागणी केली होती. त्यानंतर रेस्टॉरंटमध्ये घुसून आतील साहित्याची मोडतोडही केली होती. रेस्टॉरंटमध्ये गैरप्रकार घडत असून परवाना नसताना ते चालवल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या प्रकरणानंतर त्या भागात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यानंतर उपअधीक्षकांनी या प्रकरणाची चौकशी करून उपजिल्हाधिकार्‍यांना सादर केलेल्या अहवालात, कळंगुट पंचायतीने ते रेस्टॉरंट परत सुरू करण्यास जोरदार हरकत घेतल्याचे म्हटले होते. तसेच कळंगुट पंचायतीने त्याला दिलेला परवाना रद्द करून सुद्धा ते परत सुरु करण्यात आल्याचे स्पष्ट केले होते.
हे रेस्टॉरंट परत सुरू करताना त्याचे चॅम्पियन बार अँण्ड रेस्टॉरंट असे नामकरण करण्यात आले होते. या रेस्टॉरंटच्या मालकाची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असल्याने त्याच्या विरोधात काही तक्रारींही नोंद झाल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. हे रेस्टॉरंट पुन्हा सुरू केल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता उपअधीक्षकांनी व्यक्त केली होती. उपअधीक्षकांनी दिलेल्या अहवालाच्या आधारे तसेच आमदार मायकल लोबो यांनी केलेल्या विनंतीनुसार हे रेस्टॉरंट बंद करण्याचे आदेश उपजिल्हाधिकार्‍यांनी दिले. देण्यात आलेला आदेश दि. 24 डिसेंबरपासून लागू करण्यात आला असून 20 फेब्रुवारीपर्यंत तो लागू राहणार आहे. (खास प्रतिनिधी)