माजी सैनिकाचे उपोषण मागे *
By admin | Updated: December 12, 2014 23:49 IST
गडहिंग्लज येथे तहसीलदार हनुमंत पाटील यांच्या हस्ते सरबत घेऊन माजी सैनिक दत्तात्रय आंबेकर यांनी उपोषण मागे घेतले.
माजी सैनिकाचे उपोषण मागे *
गडहिंग्लज येथे तहसीलदार हनुमंत पाटील यांच्या हस्ते सरबत घेऊन माजी सैनिक दत्तात्रय आंबेकर यांनी उपोषण मागे घेतले.क्रमांक : १२१२२०१४-गड-०७गडहिंग्लज : घटप्रभा नदीवरील तारेवाडी बंधार्यानजीक पर्यायी पुलाचा प्रस्ताव नाबार्डने स्वीकारल्यामुळे आणि हडलगेपैकी लमानवाड्यातील मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर चर्चेसाठी सोमवारी (दि. १५) वनअधिकार्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचे लेखी आश्वासन प्रशासनाकडून मिळाल्यामुळे हडलगेचे माजी सैनिक दत्तात्रय आंबेकर यांनी येथील प्रांत कचेरीसमोर सुरू केलेले बेमुदत उपोषण आज, शुक्रवारी रात्री उशिरा मागे घेतले.तहसीलदार हनुमंत पाटील यांनी आंबेकर यांच्याशी चर्चा केली. तारेवाडी पुलाच्या प्रस्तावासंदर्भातील लेखी पत्र सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे देण्यात आले, तर लमानवाड्यासाठी बैठकीचे आश्वासन तहसीलदारांनी दिले. त्यामुळे त्यांनी उपोषण मागे घेतले. यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे शाखा अभियंता प्रवीण मोरे व सतीश बोळके, सदाशिव कळविकी, अजित बंदी, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)