शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

महिलांना अश्लील मेसेज पाठवणारा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2016 04:23 IST

दीड हजार महिलांना अश्लील मॅसेज पाठविणाऱ्या ३१ वर्षीय सराईतास पोलिसांनी गजाआड केले. मोहंमद खालीद, असे त्याचे नाव असून, एका महिलेच्या तक्रारीनंतर त्याला अटक केली असता इतरही

नवी दिल्ली : दीड हजार महिलांना अश्लील मॅसेज पाठविणाऱ्या ३१ वर्षीय सराईतास पोलिसांनी गजाआड केले. मोहंमद खालीद, असे त्याचे नाव असून, एका महिलेच्या तक्रारीनंतर त्याला अटक केली असता इतरही अनेक जणींना त्याने असेच मॅसेज करून त्रास दिला होता, अशी धक्कादायक माहिती पुढे आली.दिल्लीतील एका महिलेला दोन मोबाइल फोन नंबर्सवरून अश्लील छायाचित्रे व लिखित मॅसेज पाठविण्यात आले होते. तिने या नंबर्सवर संपर्क साधला असता उलट तिलाच धमकाविण्यात आले. पॉर्न वेबसाईटवर तिचा नंबर व व्हॉटस् अ‍ॅपवरील छायाचित्र अपलोड करण्याची पलीकडून धमकी देण्यात आली. अखेर महिलेने पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी धमकी देणाऱ्याच्या नंबरचा तपशील मिळवला असता बनावट ओळखपत्र वापरून ते सीमकार्ड खरेदी करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. तथापि, पोलिसांनी आपला तपास चालूच ठेवला व एका संशयितावर त्यांनी नजर स्थिर केली.दिल्लीच्या सदर बाजार परिसरात आपल्या वडिलांबरोबर बॅगचे एक दुकान चालविणाऱ्या मोहंमद खालीदला अखेर पोलिसांनी उचलले. आधी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली; परंतु पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून २ मोबाइल फोनही जप्त करण्यात आले, अशी माहिती पोलीस उपायुक्त विजयसिंग यांनी दिली.त्याच्या फोनमधून सुमारे २ हजार महिलांचे फोन नंबर्स मिळाले. तो सहजगत्या कोणत्याही नंबरवर कॉल करीत असे. (लोकमत न्यूज नेटवर्क)असा सापडला जाळ्यातत्याने बनावट ओळखपत्र वापरून सीमकार्ड मिळवले होते. त्यामुळे बरेच दिवस त्याच्यापर्यंत पोलीस पोहोचू शकत नव्हते.ते सीम त्याने दिल्लीच्या सदर बाजार भागातून खरेदी केले होते. त्याचे दुकानही त्याच परिसरात आहे.पोलिसांनी सीमच्या व्यवहारांवर नजर ठेवली असता ते त्याच भागात वापरले जाते, असे लक्षात आले.सीमचे रिचार्जही तो याच भागातून करीत होता. त्यावरून पोलिसांनी त्याला संशयित म्हणून पकडले. नंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.