शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते अपघात ५० टक्के कमी करण्याचे प्रयत्न

By admin | Updated: January 12, 2016 02:06 IST

भारतात दरवर्षी सुमारे पाच लाख अपघात होतात. त्यात साधारणत: दीड लाख लोक मृत्युमुखी पडतात आणि तीन लाख लोक कायमचे अपंग होतात. अपघातात जीव गमावणाऱ्यांमध्ये

- सुरेश भटेवरा,  नवी दिल्लीभारतात दरवर्षी सुमारे पाच लाख अपघात होतात. त्यात साधारणत: दीड लाख लोक मृत्युमुखी पडतात आणि तीन लाख लोक कायमचे अपंग होतात. अपघातात जीव गमावणाऱ्यांमध्ये २५ ते ३० वयोगटातील तरुणांची संख्या मोठी आहे. देशाचे ५५ ते ६० कोटींचे नुकसान होते. ही रक्कम देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या ३ टक्के आहे. हे महाभयंकर नुकसान टळावे व अपघाताचे प्रमाण किमान ५० टक्क्यांनी घटावे, यासाठी केंद्रीय परिवहन मंत्रालयाने विविध उपाययोजनांना वेगाने प्रारंभ केला आहे, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकारांना दिली. देशभर रस्ता सुरक्षा सप्ताह सोमवारपासून सुरू झाला. दिल्लीत इंडिया गेटवर त्याचे झेंडा दाखवून औपचारिक उद्घाटन गृहमंत्री राजनाथसिंह यांनी केले. यावेळी गडकरींनी संवाद साधला.भारतात वाढत्या अपघातांची तीन प्रमुख कारणे आहेत. रस्त्यांची नागमोडी वळणे, अप्रशिक्षित चालकांना सर्रास वाहनचालक परवाना देणे तसेच वाहनचालक व वाहनांना परवाना देण्याच्या पध्दतीतील ठळक त्रुटी. प्रचलित व्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्यासाठी संगणकाद्वारे नियंत्रित कठोर परीक्षेत उत्तीर्ण झाल्याशिवाय यापुढे वाहनचालक परवाना कोणालाही मिळणार नाही, असे नमूद करीत गडकरी म्हणाले, संगणकाद्वारे नियंत्रित ड्रायव्हिंगची अत्याधुनिक परीक्षा घेण्याची केंद्रे प.बंगाल, राजस्थान तसेच महाराष्ट्रात पुणे येथे ५ ते ६ एकर जागेत सुरू झाली आहेत. लवकरच अशी केंद्रे देशभर स्थापन केली जातील.