शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

आसाम, बिहारमध्ये पुराचे थैमान, ५१ बळी

By admin | Updated: July 31, 2016 05:01 IST

बिहार आणि आसाममधील पूरपरिस्थिती बिघडतच चालली असून, आतापर्यंत या दोन्ही राज्यांतील पुरात ५१ जणांचा बळी गेला

पाटणा/गुवाहाटी : बिहार आणि आसाममधील पूरपरिस्थिती बिघडतच चालली असून, आतापर्यंत या दोन्ही राज्यांतील पुरात ५१ जणांचा बळी गेला आहे. बिहारमधील मृतांची संख्या २६ आणि आसामधील आकडा २५ आहे. दोन्ही राज्यांत धोक्याच्या पातळीवरून वाहणाऱ्या नद्यांचा फटका ४१ लाख लोकांना बसला आहे. केंद्र सरकारने आसाममधील पुरात मरण पावलेल्यांच्या नातेवाईकांना चार लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मात्र, बिहारबाबत केंद्राने असा निर्णय अद्याप घेतलेला नाही. ओडिशामध्येही जोरदार पाऊस सुरू झाला असून, तिथे शनिवारी ठिकठिकाणी विजा पडून २९ जण मरण पावल्याचे वृत्त आहे. पिके भुईसपाट बिहारमध्ये गंभीर पुरस्थितीचा पुर्णिया, किशनगंज, अरारिया, दरभंगा, माधेपुरा, भागलपूर, कथिहार, सहरसा, सुपौल आणि गोपाल या जिल्ह्यांतील २१.९९ लाख लोकांना तडाखा बसला. १.८३ लाख हेक्टर एवढे क्षेत्र पाण्याखाली असून, ०.८३ लाख हेक्टरवरील पिके भुईसपाट झाली आहेत. पाऊस आणि पुरामुळे झालेल्या हानीचा आढावा घेणे सुरू आहे. (वृत्तसंस्था)>आसाममध्ये २१ जण मृत्युमुखीआसाममध्ये पुराचे थैमान सुरूच असून, मुसळधार पाऊस आणि फुगलेल्या नद्यांचा १९ लाख लोकांना फटका बसला आहे. अरुणाचल प्रदेश आणि भूतानमधील संततधार पावसामुळे आसाममध्ये पूरस्थिती निर्माण झाली. लखीमपूर, गोलाघाट, बोंगाईगाव, जोरहाट, ढेमाजी, बारपेटा, गोलपारा, धुबरी, दरांग, मोरीगाव आणि सोनीतपूर या जिल्ह्यांना पुराचा प्रचंड तडाखा बसला आहे, याशिवाय सिवसागर, कोकराझार, दिब्रूगड, गोलपारा, तिनसुकिया, बिस्वनाथ, नलबारी, बकसा, कामरूप (एम), चिरांग, कामरूप आणि दक्षिण कामरूप या जिल्ह्यांनाही झळ बसली आहे. आसाममधील पुरात आतापर्यंत २१ जणांचा बळी गेला आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी आज हेलीकॉप्टरमधून पूरपरिस्थितीची पाहणी केली. तेथील स्थिती भयंकर असल्याने, केंद्र सरकार आसामला संपूर्ण मदत करेल, असे ते नंतर म्हणाले.>बिहारमध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारण दल बिहारच्या पूरग्रस्त भागात अडकलेल्या लोकांची सुटका करण्यासाठी ८,८५० बोटी तैनात करण्यात आल्या असून, ३.८९ लाख लोकांना आतापर्यंत सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. राज्य सरकारने विविध जिल्ह्यांत राष्ट्रीय आपत्ती निवारण दल आणि राज्य आपत्ती निवारण दलाचे प्रत्येकी एक पथक तैनात केले आहे.