शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

विरोध केला म्हणून काँग्रेसच्या नेत्यांना अडचणीत आणण्याचे प्रकार अशोक चव्हाण : सरकार आरएसएस चालवतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2016 23:56 IST

सरकारच्या चुकीच्या धोरणांना विरोध केला म्हणून काँग्रेसच्या नेत्यांना अडचणीत आणण्याचे काम सुरू झाले आहे.

जळगाव- सरकारच्या चुकीच्या धोरणांना विरोध केला म्हणून काँग्रेसच्या नेत्यांना अडचणीत आणण्याचे काम सुरू झाले आहे. अगदी सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यापासून आम्हाला असा त्रास दिला जात आहे. आम्ही कार्यक्रमांमध्ये जे बोलतो ते राज्य शासनासह दिल्लीपर्यंत अगदी शब्दन् शब्द स्वरुपात पाठविले जाते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) सरकार चालवित आहे. लोकांमध्ये फूट पाडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार अशोक चव्हाण यांनी शनिवारी जळगावात काँग्रेसच्या कार्यकर्ता कार्यशाळेत केला. लेवा भवनात ही कार्यशाळा झाली. व्यासपीठावर आमदार भाई जगताप, भा.ई.नगराळे, जिल्हा प्रभारी शोभा बच्छाव, जिल्हाध्यक्ष ॲड.संदीप पाटील, शहराध्यक्ष डॉ.अर्जुन भंगाळे आदी उपस्थित होते. चव्हाण म्हणाले, ग्रा.पं.स्तरावपर्यंत आरएसएस विष पसरवित आहे. अगदी मलाही आरएसएसचे कार्यकर्ते दिल्लीत भेटले. त्यांनी मला आरएसएसची धोरणे, उद्देश याची माहिती दिली, पण मी काँग्रेसच्या विचारांचा आहे. मंत्रीमंडळाचा दौरा फोटोंसाठीअधिवेशनापूर्वी आता मंत्रीमंडळाने दुष्काळ दौरा सुरू केला, पण ते फक्त फोटो काढून घेण्यासाठी व आम्ही काहीतरी करतोय हे दाखविण्यासाठी काही जिल्‘ामध्ये फिरले. सायंकाळी पार्टी खाऊन ते निघून गेले, अशी टिकाही चव्हाण यांनी केली. विद्यार्थ्यांची मुस्कटदाबीरोहित वेमुला, कन्हैया कुमार यांच्याबाबत जे घडले, देशात सध्या जे घडतेय ते घातक आहे. जे विचार मांडतात, सरकारच्या विरोधात बोलतात त्यांची मुस्कटदाबी केली जाते. विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करून देशद्रोही ठरविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लोकांमध्ये फूट पाडून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचे काम सुरू आहे, असा दावाही चव्हाण यांनी केला. स्वबळावर लढूआगामी काळात जि.प., पं.स.च्या निवडणुका स्वबळावर लढल्या जातील. त्या त्या जिल्‘ांची स्थिती लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसशी प्रासंगिक करार केले जातील. पण राष्ट्रवादी काँग्रेस शब्द पाळत नाही. त्यामुळे त्यांच्यासोबत निवडणूक लढणार नाही. तसेच काँग्रेसमध्ये पुनर्बांधणीच्या दृष्टीने राज्यभरत प्रत्येक विधानसभा मतदारसंघात संबंधित जिल्‘ाबाहेरील प्रभारी नियुक्त केला जाईल, असे चव्हाण यांनी पत्रपरिषदेत विविध प्रश्नांची उत्तरे देताना स्पष्ट केले.