शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

आशिष खेतानवर पेड न्यूजच्या आरोपाने 'तहलका'

By admin | Updated: April 20, 2015 16:58 IST

२ जी घोटाळ्यात एस्सारच्या समर्थनार्थ आशिष खेतान यांनी पेड न्यूज केली होती असा गंभीर आरोप प्रशांत भूषण यांनी केला आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २० -  आम आदमी पक्षाचे बंडखोर नेते प्रशांत भूषण यांनी आपवर पलटवार केला असून आपचे नेते आशिष खेतान यांनी २ जी घोटाळ्यात एस्सार कंपनीच्या समर्थनार्थ एक लेख लिहील्याचा गंभीर आरोप केला आहे. या लेखातून तहलका  या मासिकाला तब्बल तीन कोटी रुपयांची देणगी मिळाली असा दावाही त्यांनी केला आहे. 
आम आदमी पक्षाच्या शिस्त पालन समितीने आपचे बंडखोर नेते प्रशांत भूषण व योगेंद्र यादव यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यानंतर सोमवारी प्रशांत भूषण यांनी आपवर पलटवार करत शिस्तपालन समितीच्या सदस्यांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. २ जी घोटाळ्यात एस्सार कंपनीच्या समर्थनार्थ आशिष खेतान  यांनी तहलकामध्ये लेख लिहीला होता, हा लेख सलमान खुर्शीद यांच्या सांगण्यावरुन लिहीण्यात आला होता, या लेखाच्या मोबदल्यात तहलकाला थिंकफेस्टसाठी ३ कोटी रुपये मिळाले असा गंभीर आरोप भूषण यांनी केला आङे. या शिवाय पक्षाचे नेते पंकज गुप्ता यांनीदेखील संशयास्पद कंपन्यांकडून दोन कोटी रुपयांची देणगी स्वीकारला असा दावाही त्यांनी केला आहे.  अशा या वादग्रस्त नेत्यांचा समावेश शिस्तपालन समितीत करुन ते न्याय कसा करु शकतील असा सवालच त्यांनी उपस्थित केला. 
तर आशिष खेतान हे इमानदार पत्रकार असून प्रशांत भूषण यांच्याकडे पुरावे असतील तर ते त्यांनी जाहीर करावे असे सांगत आप नेते आशुतोष यांनी खेतान यांचा बचाव केला आहे.