आर्थूर आज पुन्हा क्राईम ब्रँचमध्ये
By admin | Updated: August 13, 2015 23:24 IST
मडगावचे नगराध्यक्ष
आर्थूर आज पुन्हा क्राईम ब्रँचमध्ये
मडगावचे नगराध्यक्षक्राईम ब्रँचमध्येपणजी : सार्वजनिक बांधकाम खात्यातील जैका विभागाच्या आल्तिनो येथील कार्यालयातून जी फाईल गायब झाली आहे, ती फाईल क्राईम ब्रँचच्या ताब्यात आहे, अशा अर्थाचे उत्तर दिगंबर कामत यांच्या आरटीआयखालील अर्जास जैका विभागातील अधिकार्यांनी दिल्यामुळे मडगावचे नगराध्यक्ष आथरूर डिसिल्वा चर्चेत आले आहेत. ती फाईल क्राईम ब्रँचच्या ताब्यात नाहीच. तरीदेखील जैका विभागातील अधिकार्यास आरटीआयखाली खोटे उत्तर देण्यास डिसिल्वा यांनी भाग पाडले, असा क्राईम ब्रँचला दाट संशय आहे; कारण कामत यांनी केलेल्या अर्जास अधिकार्यांनी दिलेले लेखी उत्तर घेऊन जाण्यासाठी डिसिल्वा हे जैका विभागात आले होते. डिसिल्वा यांना क्राईम ब्रँचमध्ये पोलिसांनी सकाळी बोलावून घेतले. दुपारी बारा वाजेपर्यंत ते क्राईम ब्रँचमध्ये होते. त्यांना शुक्रवारी (दि. 14) पुन्हा बोलविले आहे...........................