वाहतूक पोलिसाशी हुज्जतबाजी करणाऱ्यास अटक
By admin | Updated: February 11, 2015 00:33 IST
वाहतूक पोलिसाशी हुज्जतबाजी करणाऱ्यास अटक
वाहतूक पोलिसाशी हुज्जतबाजी करणाऱ्यास अटक
वाहतूक पोलिसाशी हुज्जतबाजी करणाऱ्यास अटकनागपूर : शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल जरीपटका पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रकाश दमडुजी राठोड (४७) रा. पोलीस लाईन टाकळी हे वाहतूक पोलीस पेट्रोलिंग करीत असताना आरोपी जयदेवकुमार लिखदेव महंतोडांगी (१९) हा रॉंगसाईड गाडी चालविताना दिसला. त्यास थांबविले असता आरोपीने देवेंद्र गणपत जुगेले (३४) यास बोलावले. त्यांनी संगनमत करून वाहतूक पोलीस प्रकाश राठोड यांना आपले कर्तव्य पार पाडण्यापासून रोखून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी आरोपी जयदेवकुमार महंतोडांगी यास अटक केली आहे.