शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकात अल्पवयीन बहिणीवर बलात्कार करणा-या भावाला अटक

By admin | Updated: February 11, 2016 18:14 IST

कर्नाटकच्या नेजारमध्ये बहिण-भावाच्या पवित्र नात्याला कलंक लावणारी घटना समोर आली आहे.

ऑनलाइन लोकमत 

नेजार, दि. ११ - कर्नाटकच्या नेजारमध्ये बहिण-भावाच्या पवित्र नात्याला कलंक लावणारी घटना समोर आली आहे. कर्नाटकच्या दाक्षिणा कन्नड जिल्ह्यात नेजारमध्ये सख्ख्या भावाने अल्पवयीन बहिणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 
 
कर्नाटक पोलिसांनी सख्या अल्पवयीन बहिणीवर बलात्कार करणा-या नराधम भावाला अटक केली आहे. श्रीधर असे आरोपीचे नाव आहे. डीएनए चाचणीतून बलात्कार केल्याचे सिद्ध झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी श्रीधरला (२२) अटक केली. 
 
पिडित मुलगी १४ वर्षांची आहे. जून ते ऑगस्ट २०१५ दरम्यान श्रीधर दारु पिऊन आल्यानंतर त्याने प्रत्येकवेळी आपल्या अल्पवयीन बहिणीवर अत्याचार केला. पिडीत मुलीचे आई-वडिल दैनंदिन रोजंदारीवर काम करणारे मजूर आहेत. त्याना श्रीधरच्या गुन्ह्याची पूर्ण माहिती होती. तरीही ते मूक बनून राहिले. 
 
जेव्हा मुलगी गर्भवती राहिल्याचे समजले तेव्हा त्यांनी मुलीचा गर्भपात केला. स्थानिक रुग्णालयाने ही घटना पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली. कुटुंबाच्या प्रतिष्ठेचा विचार करुन मुलगी आरोपीचे नाव सांगण्यास धजावत नव्हती. बाहेरची व्यक्ती यामध्ये सहभागी नसल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी घरातील पुरुषांची चौकशी सुरु केली. त्यांची डीएनए टेस्ट केली. स्थानिक न्यायालयाने श्रीधरला २७ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.