शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

लष्करासही मॅगी नकोशी!

By admin | Updated: June 4, 2015 05:02 IST

‘बस्स दो मिनिट’च्या जाहिरातीद्वारे घराघरात पोहोचलेल्या मॅगी नूडल्सचे नमुने सदोष आढळल्यानंतर हे उत्पादन बनविणाऱ्या नेस्ले इंडिया कंपनीला एकापाठोपाठ एक जबर धक्के

नवी दिल्ली : ‘बस्स दो मिनिट’च्या जाहिरातीद्वारे घराघरात पोहोचलेल्या मॅगी नूडल्सचे नमुने सदोष आढळल्यानंतर हे उत्पादन बनविणाऱ्या नेस्ले इंडिया कंपनीला एकापाठोपाठ एक जबर धक्के बसू लागले आहेत. केरळपाठोपाठ दिल्ली सरकारने बुधवारी मॅगीच्या विक्रीवर १५ दिवसांसाठी बंदी लादली. बिग बजार, डी मार्ट, नीलगिरी सुपरमार्केट आणि इझी-डे यासारख्या मॉल्स व सुपर मार्केटसह केंद्रीय भांडारातही मॅगीची विक्री थांबविण्यात आली. तिकडे केंद्र्र सरकारने यासंदर्भात स्वत:हून राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे (एनसीडीआरसी) तक्रार दाखल केली. एवढेच नव्हे, तर लष्कराने आपल्या जवानांना मॅगी न खाण्याचे निर्देश जारी केले. या एकापाठोपाठ एक अशा धक्क्यांतच गोव्यात मात्र मॅगीला ‘क्लीन चिट’ मिळाली.दिल्ली सरकारने प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत मॅगी नूडल्सचे १३ पैकी १० नमुने फेल ठरल्यानंतर बुधवारी मॅगीच्या विक्रीवर १५ दिवसांसाठी तत्काळ प्रभावाने बंदी लादली. मॅगीचा संपूर्ण स्टॉक परत घेण्याचे निर्देशही दिल्ली सरकारने दिले. तत्पूर्वी दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी नेस्लेच्या अधिकाऱ्यांची चर्चा केली. मात्र या अधिकाऱ्यांचे दावे असमाधानकारक वाटल्याने मॅगी नूडल्सच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय जैन यांनी जाहीर केला. केवळ मॅगीच नाही तर अन्य कंपन्यांच्या नूडल्सचे नमुनेही घेतले जातील. तेही आरोग्याच्या दृष्टीने सदोष आढळल्यास त्याविरुद्धही कडक कारवाई केली जाईल, असेही दिल्ली सरकारने स्पष्ट केले आहे. लष्कराने बुधवारी आपल्या जवानांना मॅगी नूडल्स न खाण्याचे निर्देश जारी केले. पुढील आदेशापर्यंत लष्कराच्या कॅन्टीनमध्ये मॅगी नूडल्स बनणार नाही, असे निर्देशही लष्कराने दिले. मॅगी हे जवानांमधील लोकप्रिय ‘स्नॅक्स’ आहे. मात्र लष्कराच्या या आदेशानंतर सुमारे एक हजार लष्करी कॅन्टीनमध्ये आता मॅगी बनणार नाही. हा नेस्लेसाठी फार मोठा धक्का मानला जात आहे. केंद्र सरकारने सुमारे तीन दशके जुन्या ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदींचा पहिल्यांदा वापर करीत स्वत: मॅगीप्रकरणी एनसीडीआरसीकडे तक्रार  दाखल केली. तूर्तास एनसीडीआरसी नेमकी काय कारवाई करेल, हे स्पष्ट नाही. मात्र याप्रकरणी चौकशी करून एनसीडीआरसी योग्य ती पावले उचलेल, असे केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहारमंत्री रामविलास पासवान यांनी सांगितले. या प्रकरणात केंद्राने प्रथमच ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम १२-१(ड)चा वापर केला. या कलमानुसार ग्राहक हितार्थ केंद्र आणि राज्यांना आयोगाकडे तक्रार दाखल करण्याचा अधिकार आहे.कर्नाटक, तामिळनाडू, पंजाब, तेलंगण, पश्चिम बंगाल आदी राज्यांनी राज्यभरातील मॅगी नूडल्सचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्याचा निर्णय घेतला. पश्चिम बंगाल विधानसभेत मॅगीवर बंदी लादण्याची मागणी केली गेली.राज्याच्या एफडीएने मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर येथून १५ नुमने तपासणीसाठी घेतले होते. त्यातले ८ सॅम्पल्स मुंबईच्या राज्य सरकारच्या मालकीच्या लॅबमध्ये पाठवले गेले. उर्वरित ७ नमुने पुण्याला केंद्र शासनाच्या लॅबमध्ये पाठवले गेले. मुंबईतल्या लॅबचे पहिले दोन नमुने ‘खाण्यास योग्य’ असे आले. त्यामुळे उर्वरित ६ नुमने पुण्यात पाठवण्याचा निर्णय घेतला गेला. आता पुण्याच्या लॅबमध्ये मुंबईचे सहा आणि पुण्यात याआधी पाठवलेले ७ असे १३ नमुने तपासणीसाठी गेलेले आहेत. खाण्यात शिशाचे प्रमाण किती आहे, याचा अहवालही लॅब देणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)