शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

पारनेरमधील अनधिकृत फलकांना चाप, दर लागू होणार

By admin | Updated: January 9, 2016 12:25 IST

पारनेर नगरपंचायत मासिक सभेत निर्णय : पाणीप˜ी वाढीचाही निर्णय

पारनेर नगरपंचायत मासिक सभेत निर्णय : पाणीपट्टी वाढीचाही निर्णयपारनेर : नगरपंचायतीच्या निकषाप्रमाणे पारनेर शहरातील पाणीपट्टी वाढविण्याचा तसेच पारनेरमधील अनधिकृत फलकांवर कारवाई करतानाच त्यांच्यासाठीही आता दर लागू करण्याचा निर्णय पारनेर नगरपंचायतीच्या पहिल्याच मासिकबैठकीत घेण्यात आला. यातील घरपट्टीवाढीचा निर्णय मात्र लांबणीवर पडला आहे.पारनेर नगरपंचायतीची पहिली मासिक सभा गुरूवारी नगराध्यक्षा सीमा औटी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी पाणीपुरवठ्यावर मोठ्या प्रमाणात खर्च होत असून त्यात व पाणीपट्टी वसुलीत मेळ बसत नसल्याने पाणीपट्टीत वाढ करावी लागणार असल्याचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी सांगितले. सध्या दुष्काळी परिस्थिती असून पाणीपट्टी किमान वर्षभर वाढवू नये, असे मत नगरसेविका शशिकला शेरकर यांनी मांडले. त्यांच्या या मुद्याला विजेता सोबले, संगीता औटी, वर्षा नगरे, मालन शिंदे यांनीही साथ देत पाणीपट्टी वाढीला विरोध दर्शविला. मात्र पाणीपुरवठाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी काही कठोर निर्णय घेणे आवश्यक असल्याचे सत्ताधार्‍यांनी सांगितले व वाढीला मंजुरी दिली. हंगा तलावाजवळून पारनेर शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. तेथे काही विकास कामे करायची आहेत, असा प्रस्ताव पाणीपुरवठा समितीचे सभापती नंदकुमार देशमुख यांनी मांडला. त्यास मंजुरी देण्यात आली. उपनगराध्यक्ष अनिकेत औटी यांनी पारनेर शहराच्या विकासासाठी सर्व नगरसेवकांनी एकत्र येणे गरजेचे असून सर्व नगरसेवकांनी नगरपंचायतीत येऊन विकासकामांकडे लक्ष दिले पाहिजे, असे मत नोंदविले.पारनेर शहरात फ्लेक्सवर कर लावण्यात येणार असून त्यामुळे अनधिकृत फलकांना चाप बसेल व उत्पन्न वाढेल, असे मत नगरसेवकांनी व्यक्त केले. यावेळी उपनगराध्यक्ष अनिकेत औटी, बांधकाम सभापती किसन गंधाडे, पाणीपुरवठा समितीचे सभापती नंदकुमार देशमुख, सार्वजनिक आरोग्य सभापती डॉ.मुदस्सर सय्यद, महिला व बालकल्याण सभापती सुरेखा भालेकर व मुख्याधिकारी गणेश शिंदे, नगरसेवक चंद्रकांत चेडे, विशाल शिंदे, नंदकुमार औटी, दत्ता कुलट, वैशाली औटी, नंदा देशमाने, गणपत अंबुले आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)