शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

अपु:या पावसानंतरही साखरेचे उत्पादन वाढणार!

By admin | Updated: July 12, 2014 01:19 IST

जुलै उजाडल्यानंतरही देशाच्या काही भागात असलेली मान्सूनची अनुपस्थिती, तसेच अपुरा पाऊस अशी परिस्थिती असली, तरी यावर्षी साखरेचे उत्पादन 4 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे.

नवी दिल्ली : जुलै उजाडल्यानंतरही देशाच्या काही भागात असलेली मान्सूनची अनुपस्थिती, तसेच अपुरा पाऊस अशी परिस्थिती असली, तरी यावर्षी साखरेचे उत्पादन 4 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे. 
उसाच्या 2क्14-15 च्या गळीत हंगामात साधारणपणो 2.53 कोटी टन साखरेचे उत्पादन होईल, अशी अपेक्षा इंडियन शुगर मिल असोसिएशनने (आयएसएमए) व्यक्त केली आहे. ऑक्टोबर 2क्14 पासून उसाचा गळीत हंगाम सुरू होईल. गेल्या वर्षी 2.43 कोटी टन साखरेचे उत्पादन झाले होते.  
गेल्या वर्षीचा 75 लाख टनाचा साखरेचा साठा आणि यावर्षी उत्पादनात होणारी वृद्धी लक्षात घेता 2.45 कोटी टन साखरेच्या मागणीची पूर्तता करण्यात कोणतीही अडचण येणार नाही, असेही इंडियन शुगर मिल असोसिएशनने स्पष्ट केले आहे; मात्र दुसरीकडे साखरेच्या वाढत्या उत्पादनामुळे तिच्या साठवणुकीची चिंता साखर कारखान्यांना सतावणार आहे.  जूनच्या मध्यात प्राप्त झालेल्या उपग्रहाच्या छायाचित्रंनुसार 2क्14-15 मध्ये 52.3 कोटी हेक्टर क्षेत्रवर उसाची लागवड होईल, असे गृहीत धरण्यात आले आहे. गेल्या वर्षीपेक्षा ही लागवड दोन टक्के कमी आहे. मात्र त्यानंतरही महाराष्ट्र व कर्नाटकमध्ये साखरेचा सरासरी उतारा 11.5 टक्के असल्याने साखरेचे उत्पादन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात साखरेचा उतारा सुमारे 9.5 टक्के आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क) 
 
4जलाशय व धरणांच्या पाण्यामुळे महाराष्ट्र व कर्नाटकात उसाच्या लागवडीत वाढ झाल्याचे तर उत्तर प्रदेश व तामिळनाडूत लागवड घसरल्याचे ‘आयएसएमए’ने म्हटले आहे. यावर्षी महाराष्ट्रात उसाच्या लागवडीत सुमारे 13 टक्के वाढ ‘आयएसएमए’ने गृहीत धरली आहे.