शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकातही पिकताहेत सफरचंदे!

By admin | Updated: February 10, 2015 03:54 IST

उष्णकटिबंधीय (ट्रॉपिकल) हवामान असलेल्या कर्नाटकात सफरचंदे पिकविण्याचे प्रयोग काही हुन्नरी शेतकरी करीत असून यात त्यांना

सिमला : उष्णकटिबंधीय (ट्रॉपिकल) हवामान असलेल्या कर्नाटकात सफरचंदे पिकविण्याचे प्रयोग काही हुन्नरी शेतकरी करीत असून यात त्यांना व्यापारी पातळीवर यश आले तर देशाच्या फलोद्यान क्षेत्रात एक प्रकारे क्रांती होऊन सफरचंदांच्या बाबतीत हिमामल प्रदेश आणि काश्मीरची सध्या असलेली मक्तेदारी संपुष्टात येऊ शकेल.हिमाचल प्रदेशातील मंडी येथील एक कृषी वैज्ञानिक चिरंजीत परमार यांनी सहसा समशीतोष्ण हवामानातील सफरचंद हे फळ उष्णकटिबंधीय वातावरणात पिकविण्याचे तंत्र विकसित केले असून कर्नाटकात सध्या सुरु असलेल्या सफरचंदाच्या बागा फुलविण्यासाठीही तेच शेतकऱ्यांना तंत्रशास्त्रीय ज्ञान देत आहेत. परमार हे पूर्वी सोलन येथील वाय.एस. परमार फलोद्यान व वनीकरण विद्यापीठात संशोधक-अध्यापक होते. इंडोनेशियात उष्णकटिबंधीय हवामानात पिकविल्या जाणाऱ्या सफरचंदांच्या बागांचा अभ्यास केल्यानंतर ते आता तोच प्रयोग भारतात करीत आहेत.परमार यांनी सांगितले की, थंडीचा हंगाम जवळजवळ नसलेल्या केरळ व तमिळनाडू यासारख्या उष्णकटिबंधीय वातावरणाच्या राज्यांमध्येही सफरचंदाचे पिक घेणे शक्य असून हे प्रयोग यशस्वी झाले तर भारतात सफरचंद लागवडीत क्रांती होऊ शकेल.परमार यांनी दिलेल्या माहितीनुसार कर्नाटकातील सफरचंद लागवड सध्या प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आली असून ही व्यापारीदृष्ट्या कितपत यशस्वी होते याचा अनुमान काढायला आणखी दोन-तीन वर्षे जावी लागतील.कर्नाटकच्या मुख्यत: कुर्ग, तुमकुर, चिकमगळूर आणि शिमोगा जिल्ह्यांमध्ये सफरचंदाच्या सहा हजारांहून अधिक झाडांची लागवड करण्यात आली आहे. पहिली रोपे सन २०११ मध्ये लावली गेली. कुल्लु फलोद्यान विद्यापीठाच्या बजौरा रोपवाटिकेतून ही रोपे पुरविली गेली. (वृत्तसंस्था)