शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

कॉलेजरोडवर अतिक्रमणविरोधी मोहीम महात्मानगरपासून सुरुवात : ४७ अनधिकृत बांधकामांवर हातोडा

By admin | Updated: March 24, 2015 23:52 IST

नाशिक : अपुर्‍या पोलीस बळामुळे अनधिकृत बांधकामांविरोधी मोहिमेत खंड पडल्यानंतर महापालिकेने मंगळवारी पोलीस बंदोबस्त मिळताच महात्मानगर आणि कॉलेजरोड परिसरातील अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालविला. दिवसभर चाललेल्या या मोहिमेत रस्त्यांच्या दुतर्फा असलेली ४७ अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली, तर रस्त्यांवर व्यावसायिकांकडून ठेवण्यात आलेले ९३ जाहिरात फलक जप्त करण्यात आले. प्रामुख्याने कॉलेजरोडवरील बिग बझारच्या अनधिकृत बांधकामावरही पालिकेने जेसीबी चालविला.

नाशिक : अपुर्‍या पोलीस बळामुळे अनधिकृत बांधकामांविरोधी मोहिमेत खंड पडल्यानंतर महापालिकेने मंगळवारी पोलीस बंदोबस्त मिळताच महात्मानगर आणि कॉलेजरोड परिसरातील अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालविला. दिवसभर चाललेल्या या मोहिमेत रस्त्यांच्या दुतर्फा असलेली ४७ अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली, तर रस्त्यांवर व्यावसायिकांकडून ठेवण्यात आलेले ९३ जाहिरात फलक जप्त करण्यात आले. प्रामुख्याने कॉलेजरोडवरील बिग बझारच्या अनधिकृत बांधकामावरही पालिकेने जेसीबी चालविला. तीन महिन्यांपूर्वी गंगापूररोड, पाथर्डी फाटा व पेठरोड परिसरात अतिक्रमण मोहीम राबविल्यानंतर पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याचे कारण दर्शवित मोहीम थंडावली होती. दरम्यानच्या कालावधीत महापालिकेने किरकोळ स्वरूपातील अतिक्रमणे हटविली; परंतु मोठी कारवाई होत नव्हती. महापालिकेने पुरेसा पोलीस बंदोबस्त मिळावा यासाठी पोलीस आयुक्तालयाकडे वारंवार स्मरणपत्रे पाठविली; परंतु त्याची दखल घेतली जात नव्हती. मंगळवारी पुरेसा पोलीस फौजफाटा मिळाल्यानंतर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने महात्मानगर येथील एबीबी सर्कलपासून अनधिकृत बांधकामांविरोधी मोहिमेस सुरुवात केली. रस्त्याच्या दुतर्फा व्यावसायिकांनी उभारलेले ओटे, पत्र्याचे शेड्स तसेच जाहिरात फलक हटविण्यात आले. त्यात प्रामुख्याने झायकॉन डेंटल क्लिनिक ॲण्ड रिसर्च सेंटरचे अनधिकृत शेड काढण्यात आले. याशिवाय नाशिकरोड-देवळाली व्यापारी बॅँक, ठाणे जनता बॅँक यांच्यासमोरील ओटे, पेव्हर ब्लॉक्स हटविण्यात आले. मोहीम सुरू असल्याचे पाहून काही व्यावसायिकांनी स्वत:हून अनधिकृत बांधकाम काढून घेण्यास सुरुवात केली. महात्मानगरनंतर पथकाने कॉलेजरोडवर आपला मोर्चा वळविला. कॉलेजरोडवरील बिग बझारबाहेरील फूड स्टॉल, विजन हॉस्पिटलची संरक्षक भिंत हटविण्यात आली. मोहिमेदरम्यान, ४ वाहने भरून जाहिरात फलक व साहित्य जप्त करण्यात आले. मोहिमेत महापालिकेचे ६० कर्मचारी आणि ४० पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. इन्फोबिग बझारचा फूड स्टॉल उद्ध्वस्तपथकाने बिग बझारच्या बाहेर असलेले लोखंडी कंपाउंड हटविण्यास सुरुवात केली तेव्हा बिग बझारच्या व्यवस्थापकांनी त्यास विरोध करण्याचा प्रयत्न केला. सदर बांधकामाबाबत महापालिकेची परवानगी असल्याचे व्यवस्थापकांकडून सांगण्यात आले; परंतु ते कागदपत्रे सादर करू न शकल्याने पथकाने अनधिकृत बांधकामांवर जेसीबी चालविला. याचबरोबर बिग बझारच्या बाहेर उभारण्यात आलेला फूड स्टॉलही उद्ध्वस्त करण्यात आला. यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. फोटो- २४ पीएचएमआर १८३कॉलेजरोडवरील बिग बझारसमोरील फूड स्टॉल हटविताना महापालिकेचे पथक.फोटो- २४ पीएचएमआर १७१कॉलेजरोडवरील बिग बझारच्या बाहेर ठेवण्यात आलेल्या ट्रॉलीज जप्त करण्यात आल्या.फोटो- २४ पीएचएमआर १८६कॉलेजरोडवरील अनधिकृत संरक्षक भिंत हटविताना पथक.फोटो- २४ पीएचएमआर १९०महात्मानगर व कॉलेजरोड परिसरात मोहीम राबविण्यात आल्यानंतर जप्त करण्यात आलेले फलक व साहित्य.