शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या सर्व समस्यांची उत्तरे एका क्लिकवर !

By admin | Updated: January 11, 2017 01:20 IST

रेल्वेच्या वेबसाइटवर प्रवाशांना नव्या सुविधा उपलब्ध करून देणारे अनेक महत्त्वाचे बदल नव्या वर्षात करण्यात येत आहेत. ट्रेन व प्रवासासंबंधी जी माहिती नॅशनल ट्रेन इन्क्वायरी सिस्टिमवर यापूर्वी मिळायची

सुरेश भटेवरा / नवी दिल्लीरेल्वेच्या वेबसाइटवर प्रवाशांना नव्या सुविधा उपलब्ध करून देणारे अनेक महत्त्वाचे बदल नव्या वर्षात करण्यात येत आहेत. ट्रेन व प्रवासासंबंधी जी माहिती नॅशनल ट्रेन इन्क्वायरी सिस्टिमवर यापूर्वी मिळायची, तिच्याविषयी अनेक तक्रारी होत्या. प्रवाशांना प्रसंगी चुकीची माहिती मिळायची. त्यात आवश्यक ते बदल करण्याचे सहा महिन्यापूर्वी रेल्वेने ठरवले होते. आता नवे सॉफ्टवेअर तयार करण्यात आले असून, रेल्वे मंत्रालयाला कम्प्युटर सॉफ्टवेअर उपलब्ध करून देणारी कंपनी ‘क्रिस’ला या सुधारणा करण्यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांनी हिरवा कंदिल दाखवला आहे.रेल्वे प्रवाशांनी सध्या आपले पीएनआर स्टेटस चेक केले तर त्यांना केवळ आपले आरक्षण सीट अथवा बर्थ ची स्थिती काय? याची माहिती वेबसाइटवर मिळते. यापुढे मात्र ही माहिती इतकी मर्यादित नसेल. उत्तरादाखल येणारा संदेश आपला प्रवास, त्या रूटवरील साऱ्या माहितीसह आपल्याला सादर करण्यात येईल. त्यात तुमच्या आरक्षणाचे स्टेटस काय? कोच नंबर कोणता, रेल्वे इंजिनापासून तो कितव्या क्रमांकावर, प्रवासात कोच बदलला असल्यास त्याची माहिती, ट्रेन वेळेवर आहे की उशिराने धावते आहे? ट्रेनचा वेग काय? नकाशावर ट्रेनच्या ताज्या स्थानाची (लोकेशनची) स्थिती. ती कोणत्या वेळी कोणत्या स्थानकावर पोहोचेल याचा तक्ता, ट्रेनचे आगमन कोणत्या प्लॅटफॉर्मवर होईल? इत्यादी प्रश्नांची उत्तरे प्रवाशाला पीएनआर स्टेटस  चेक करताना, फक्त एका  क्लिकवर मिळणार आहेत. ही सुविधा फेब्रुवारी महिन्यापासून सुरू करण्यात येत असून, त्याची घोषणा बहुदा अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या प्रसंगी केली जाईल, असे रेल्वे सूत्रांकडून सांगण्यात आले.नव्या बदलांमुळे अनेक समस्या दूर होणाररेल्वे प्रवासाचे सहज आरक्षण मिळवणे आणि निर्धास्त होणे हा प्रवाशांसाठी कायमच मोठ्या डोकेदुखीचा विषय ठरत आला आहे. कितीही अगोदर तिकिट काढले तरी बहुतांश वेळेला ते वेटिंग लिस्टचेच असते. चार्ट तयार झाल्यावर, प्रवासाला अवघे दोन तास उरले असताना, आरक्षण मिळाले की नाही, याचा उलगडा कसाबसा झाला तर धापा टाकीत प्रवाशांना रेल्वे स्थानकावर पोहोचावे लागते. आता यापैकी अनेक समस्या नव्या बदलांमुळे दूर होणार आहेत.