शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

व्यापमं घोटाळ्यातील आणखी एकाचा मृत्यू

By admin | Updated: May 9, 2015 00:06 IST

मध्यप्रदेशातील गाजलेल्या व्यावसायिक परीक्षा मंडळ (व्यापमं) घोटाळ्यातील आणखी एका आरोपीचा रहस्यमय मृत्यू झाल्याने या प्रकरणातील गुंता आणखी वाढला आहे

भोपाळ : मध्यप्रदेशातील गाजलेल्या व्यावसायिक परीक्षा मंडळ (व्यापमं) घोटाळ्यातील आणखी एका आरोपीचा रहस्यमय मृत्यू झाल्याने या प्रकरणातील गुंता आणखी वाढला आहे. मृत आरोपीचे नाव विजयसिंग असून, तो रिवा जिल्ह्यातील राहणारा आणि शाजापूरच्या जिल्हा कारागृहात फार्मासिस्ट पदावर कार्यरत होता. विजयसिंग हा व्यापमं घोटाळ्यात रहस्यमय मृत्यू झालेला आठवा आरोपी आहे. मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये मध्यप्रदेशच्या राज्यपालांचा मुलगा शैलेश यादव याचाही समावेश आहे. दरम्यान, सिंगच्या भावाने या रहस्यमय मृत्यूच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विजयसिंगचा मृतदेह गेल्या २८ एप्रिलला छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यातील एका लॉजमध्ये संशयास्पद स्थितीत आढळला. या प्रकरणाचा तपास करीत असलेल्या विशेष तपास पथकाने (एसटीएफ) व्यापमं घोटाळ्याशी संबंधित तीन प्रकरणांमध्ये त्याला अटक केली होती. तेव्हापासून तो निलंबित होता. एका प्रकरणात त्याला सोडण्यातही आले होते. यावर्षी फेब्रुवारीमध्ये जामिनावर सुटका करण्यात आल्यानंतर १७ एप्रिलला त्याला एसटीएफने पाचारण केले होते. मृत विजयसिंगचा भाऊ अभयसिंग यांनी अलाहाबादजवळील उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेशच्या सीमेवरील शंकरगड येथून दूरध्वनीवर बोलताना सांगितले की, विजयसिंगचा मृतदेह लॉजच्या ज्या खोलीत आढळला तेथे कुठलाही विषारी पदार्थ सापडलेला नाही. त्यामुळे त्याच्या मृत्यूमागे घातपाताची शक्यता आहे. शवविच्छेदन अहवालात त्याच्या शरीरात विष आढळून आल्याचे नमूद आहे. पोलिसांना खोलीतून मृत्यूपूर्वी लिहिलेले काही पत्रही मिळालेले नाही.