शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

गाय राष्ट्रमाता घोषित करा; आदित्यनाथ यांची मागणी

By admin | Updated: April 3, 2015 22:57 IST

गाय ही राष्ट्रमाता म्हणून घोषित करण्याची मागणी भाजपचे खासदार योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील हिंदू युवा वाहिनीने केली आहे.

नवी दिल्ली : गाय ही राष्ट्रमाता म्हणून घोषित करण्याची मागणी भाजपचे खासदार योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील हिंदू युवा वाहिनीने केली आहे.भाजपच्या मिस्ड कॉल सदस्यता मोहिमेला मिळालेल्या यशापासून प्रेरणा घेऊन आता हिंदू युवा वाहिनीनेही त्याच मार्गाचा अवलंब करण्याचे ठरविले आहे. गाय राष्ट्रमाता म्हणून घोषित करण्याच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी वाहिनीने अलिगड येथे प्रायोगित स्तरावर ०७५३३००७५११ मिस्ड कॉल नोंदणी मोहीम सुरू केली आहे.‘गाय ही सनातन धर्माची ओळख आहे. ती हिंदू धर्माचे प्रतीक आहे. भारताची आध्यात्मिकता आणि आर्थिक उत्पत्तीशास्त्र यांचा परस्पर संबंध आहे यात शंकाच नाही. गोवंश आणि गोसंपदा ही भारतातील ऐहिक आणि धार्मिक जग यांच्यातील दुवा आहे’, असे आदित्यनाथ म्हणाले.लोकसभा निवडणुकीत आणि काही राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर भारतात काही प्रमाणात गोवंश संरक्षण व संवर्धनाच्या मोहिमेला बळकटी मिळाली आहे. महाराष्ट्रातील युती सरकारने तसेच हरियाणातील भाजप सरकारने तर गोहत्या बंदी कायदाही केलेला आहे, हे येथे उल्लेखनीय. (लोकमत न्यूज नेटवर्क)