कलासागर केंद्राचा वर्धापनदिन
By admin | Updated: March 6, 2015 23:07 IST
उत्साहात
कलासागर केंद्राचा वर्धापनदिन
उत्साहातशिरोडा : बाजार शिरोडा येथील कलासागर कें द्राचा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी होमिओपथिक कॉलेजचे अध्यक्ष सुभाष शिरोडकर, संस्थेचे अध्यक्ष वामन खांडेपारकर, सत्कारमूर्ती सतीश हेगडे, गायक कलाकार सावळो चोडणकर, गोकुळदास नाईक, सूरज मोरजकर, प्रकाश नाईक उपस्थित होते.आपले मूल चांगले व निर्व्यसनी होण्यासाठी त्याच्या मनात संगीताची आवड निर्माण करणे पालकाचे कर्तव्य असून पालकानी आपल्या पाल्याना संगीत वर्गात पाठवावे असे आवाहन शिरोेडकर यानी केले. यावेळी गांधर्व महाविद्यालयातील संगीत परिक्षेतील यशस्वी विद्यार्थ्याना प्रमाणपत्रे देण्यात आली. प्रकाश नाईक यानी स्वागत केले.सूत्रसंचालन संतोष नाईक यानी केले. शिवानंद नाईक यानी आभार मानले.शेवटी सावळो चोडणकर यांच्या गायनाचा कार्यक्रम झाला.(वार्ताहर)ढँङ्म३ङ्म : 0603-स्रङ्मल्ल-04कॅप्शन - गायक कलाकार सावळो चोडणकर यांचा गौरव करतान सुभाष शिरोडकर बाजूला इतर मान्यवर. (छाया- संतोष नाईक).