(निनाद) देशाच्या प्रगतीसाठी संशोधनाकडे वळा : चंद्रकांत दिवेकर
By admin | Updated: August 3, 2015 22:26 IST
दौंड : 'देशाच्या प्रगतीसाठी विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून संशोधनाचे कार्य केले पाहिजे,' असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ चंद्रकांत दिवेकर यांनी व्यक्त केले.
(निनाद) देशाच्या प्रगतीसाठी संशोधनाकडे वळा : चंद्रकांत दिवेकर
दौंड : 'देशाच्या प्रगतीसाठी विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून संशोधनाचे कार्य केले पाहिजे,' असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ चंद्रकांत दिवेकर यांनी व्यक्त केले. दौंड येथे हेडगेवार स्मृती समितीच्या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. दिवेकर म्हणाले, 'देशाच्या प्रगतीसाठी विज्ञान महत्त्वाचे आहे. विज्ञानानेच आपल्या देशाचा आर्थिक, सामाजिक कायापालट केलेला आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी विज्ञानाकडे लक्ष केंद्रित करून शास्त्रज्ञ व्हावे आणि त्यातूनच देशाच्या प्रगतीला हातभार लावावा.' राहुल कुल म्हणाले, 'हेडगेवार स्मृती समितीने सामाजिक बांधिलकीतून कामकाज केले आहे. प्रगतीचा दर्जा वाढविण्यासाठी सामुदायिक प्रयत्न महत्त्वाचे आहे. अपयश ही यशाची पायरी आहे, हे समजून समाजातील प्रत्येक घटकाने आपली वाटचाल करावी.' दौंड तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष अप्पासाहेब पवार यांनीही या वेळी मनोगत व्यक्त केले. दौंड तालुका हेडगेवार स्मृती समितीचे अध्यक्ष दत्ताजी शिणोलीकर यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. सूत्रसंचालन अनंत दंडवते यांनी केले. या वेळी साने काका, राजेंद्र थोरात, संजय डाबी, श्यामराव वाघमारे, सुनील भुजबळ, बंडोपंत अंतरकर, मोहन पडवळकर, मेरगळ गुरुजी, अशोक हिरणवळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.या वेळी डॉ. हेडगेवार स्मृती समितीच्या कार्यक्रमात दहावी आणि बारावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून सामाजिक बांधिलकीतून कार्य करणार्या व्यक्तींचा गुणगौरव करण्यात आला. त्यांची नावे पुढीलप्रमाणे : सदाशिव आखाडे (उच्चांकी ऊस उत्पादक), राजेंद्र खटी (आदर्श गोपालक), राजेश पाटील (आदर्श गोपालक), राजू गजधने (योगशिक्षक), निखिल स्वामी (आदर्श गोसेवक).फोटो ओळ : दौंड येथे डॉ. हेडगेवार स्मृती समितीचे अध्यक्ष दत्ताजी शिणोलीकर विद्यार्थ्याचा गौरव करताना समवेत मान्यवर. 03082015-िं४ल्लि-02--------------