(निनाद) फंडवस्ती अंगणवाडीला शालेय साहित्य
By admin | Updated: August 18, 2015 21:37 IST
रांजणगाव गणपती : येथील फंडवस्तीवरील अंगणवाडीला ग्रामपंचायत सदस्य संदीप कुटे यांनी सुमारे ७ हजार ५०० रुपयांचे साहित्य मुलांना शालेय स्वातंत्र्यदिनाची भेट म्हणून दिले. यामध्ये २० खुर्च्या, ३ टेबल व खेळाचे साहित्य देण्यात आले. या वेळी माजी उपसरपंच रघुनाथ फंड, नेताजी फंड, बाळासाहेब फंड, सविता कुटे, चंद्रकला फंड व ग्रामस्थ उपस्थित होते. येथून पुढे फंडवस्तीवरील कुटुंबीयामध्ये जन्माला येणार्या प्रत्येक मुलीच्या नावावर ५०० रुपये कन्याजन्माचे स्वागत व आईचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येणार असल्याचे बचत गटाच्या अध्यक्षा सविता कुटे यांनी या वेळी जाहीर केले.
(निनाद) फंडवस्ती अंगणवाडीला शालेय साहित्य
रांजणगाव गणपती : येथील फंडवस्तीवरील अंगणवाडीला ग्रामपंचायत सदस्य संदीप कुटे यांनी सुमारे ७ हजार ५०० रुपयांचे साहित्य मुलांना शालेय स्वातंत्र्यदिनाची भेट म्हणून दिले. यामध्ये २० खुर्च्या, ३ टेबल व खेळाचे साहित्य देण्यात आले. या वेळी माजी उपसरपंच रघुनाथ फंड, नेताजी फंड, बाळासाहेब फंड, सविता कुटे, चंद्रकला फंड व ग्रामस्थ उपस्थित होते. येथून पुढे फंडवस्तीवरील कुटुंबीयामध्ये जन्माला येणार्या प्रत्येक मुलीच्या नावावर ५०० रुपये कन्याजन्माचे स्वागत व आईचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येणार असल्याचे बचत गटाच्या अध्यक्षा सविता कुटे यांनी या वेळी जाहीर केले. फोटो: रांजणगाव फंडवस्तीवरील अंगणवाडीच्या मुला-मुलींसमवेत मान्यवर.