अंगणवाडी कर्मचार्यांचे मानधन वाढणार!
By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST
अंगणवाडी कर्मचार्यांचे मानधन वाढणार!
अंगणवाडी कर्मचार्यांचे मानधन वाढणार!
अंगणवाडी कर्मचार्यांचे मानधन वाढणार!८ मार्चपूर्वी जाहीर होणार : मुनगंटीवार- मुंडे यांच्या चर्चेत निर्णयमुंबई : राज्यातील अंगणवाडी कर्मचार्यांना मानधन वाढ देण्यासाठी १७६ कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव तयार करून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लवकरच तो मांडण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे. येत्या ८ मार्चला महिला दिनापूर्वी ही वाढ जाहीर होण्याची शक्यता. या कर्मचार्यांच्या मागण्यांसंदर्भात वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि महिला-बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी शनिवारी वरिष्ठ अधिकार्यांची बैठक घेत हा निर्णय घेतला. ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर, महिला व बालकल्याण राज्यमंत्री विद्या ठाकूर आदी यावेळी उपस्थित होते.अंगणवाडी कर्मचार्यांना अनेक प्रकारची कामे करावी लागतात. त्या मानाने त्यांना मिळणारे मानधन तोकडे असून ते वाढविण्याचा प्रस्ताव आपल्या विभागाने वित्त विभागाला दिला आहे. या कर्मचार्यांना दिवाळीला भाऊबीज भेट यापुढे नियमितपणे दिली जाईल,असे पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले. मुनगंटीवार म्हणाले की, वित्त विभागाकडून प्रस्तावाला मंजुरी देऊन तो मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी पाठविला जाईल. येत्या महिला दिनापूर्वी मानधन वाढीचा निर्णय होईल. (विशेष प्रतिनिधी)