शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

...तर ‘विक्रांत’ वाचली असती

By admin | Updated: June 2, 2014 06:41 IST

भारतीयांच्या गळ्यातील ताईत बनलेली विमानवाहू युद्धनौका ‘आयएनएस विक्रांत’ गेल्या आठवड्यात मोडीत काढण्यासाठी रवाना झाली

डिप्पी वांकाणी, मुंबई - बांगलादेश मुक्तीसाठी भारत-पाकिस्तानमध्ये १९७१ साली झालेल्या युद्धात बजावलेल्या गौरवशाली कामगिरीमुळे भारतीयांच्या गळ्यातील ताईत बनलेली विमानवाहू युद्धनौका ‘आयएनएस विक्रांत’ गेल्या आठवड्यात मोडीत काढण्यासाठी रवाना झाली. मात्र लिलावात सहभागी झालेल्या दोन कंपन्यांनी, नौदलाने तिच्यावरून हेलिकॉप्टर सफरी सुरू करण्यास नकार दिल्याने २०११ मध्ये माघार घेतली नसती तर ‘विक्रांत’चे भवितव्य बदलले असते. लिलावात सहभागी झालेल्या सहारा उद्योग समूहातील अ‍ॅम्बी व्हॅली सिटी लिमिटेड या कंपनीतील सूत्रांनी सांगितले की, महाराष्ट्र सरकारने जेव्हा निविदा मागिवल्या तेव्हा ‘विक्रांत’वरून पर्यटकांसाठी हेलिकॉप्टर सफरी सुरू करण्याची तरतूद होती. पण नंतर नौदलाने सुरक्षेच्या कारणास्तव त्याला नकार दिला आणि आम्ही निविदा प्रक्रियेतून माघार घेतली. ‘विक्रांत’वरील धावपट्टीचा वापर करून हेलिकॉप्टर सफरी सुरू करण्यासाठी असलेली पूर्वअट ही त्यातील एकमेव अडचण होती. एखाद्या खासगी कंपनीला नौदलाच्या हवाई हद्दीचा वापर करू देणे सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नव्हते. त्यामुळे नौदलाने ही मागणी नाकारली, असे सूत्रांनी सांगितले. महाराष्ट्र अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनी आणि नौदलातील संवादाचा अभाव हेही त्यामागील एक कारण आहे. कंपनीचे अधिकारी नौदलाला न कळवता अशा हवाई सफरींसाठी निविदा कशा मागवू शकतात, असे सूत्रांनी स्पष्ट केले. सहारा समूहाच्या प्रवक्त्याने सांगितले की, आम्ही ६०० कोटी रुपयांची निविदा भरली होती आणि त्यातून माघार घेतल्याने ५ कोटी रुपयांची अनामत रक्कमही गमावली. आम्ही या युद्धनौकेवर ५०,००० चौरस फुटांचे संग्रहालय आणि सर्व सोयींनी युक्त असे हॉटेल बनवण्याचा प्रस्ताव सादर केला होता. आॅयस्टर रॉकवर स्थिरावलेल्या नौकेवरून पर्यटकांसाठी हेलिकॉप्टर सफरी, तेथे पोहोचण्यासाठी गेटवे आॅफ इंडियापासून दीड किलोमीटरचा रस्ता आणि जेट्टी (धक्का) यांचाही त्यात समावेश होता. निविदेत नौकेच्या धावपट्टीवरून हेलिकॉप्टर उड्डाणाची पूर्वअट होती. पण आम्हाला नंतर नौदलाने सुरक्षेच्या कारणास्तव नकार दिला, असे सहाराने ‘लोकमत’ला पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे.