नेमाडेंच्या ज्ञानपीठाने शहरात आनंद (२)
By admin | Updated: February 7, 2015 02:04 IST
साहित्याला देशीवाद देणारे लेखक
नेमाडेंच्या ज्ञानपीठाने शहरात आनंद (२)
साहित्याला देशीवाद देणारे लेखक साठोत्तरी मराठी वाङ्मय आमूलाग्र क्रांती आणण्याचे काम नेमाडेंनी केले. चित्रे, कोल्हटकर, ग्रेस, ढसाळ यांच्याबरोबरीने त्यांनी काव्यलेखन केले. मराठी साहित्याचा विचार मर्ढेकरकेंद्री होता पण त्यांनी हा प्रवाह देशीवादी केला. कथाकेंद्री मराठी साहित्याला कादंबरीकडे वळविले. मराठी कादंबरीला रंजकतेतून संस्कृत आणि इंग्रजी भाषांच्या प्रभावातून काढून त्याला देशीवादी आणि वास्तववादी केले. जागतिकीकरणाच्या काळात एक सांस्कृतिक भांबावलेपण आले असताना निश्चित दिशा आणि भूमिका देणाऱ्या लेखकाला हा सन्मान मिळावा, याचा मनस्वी आनंद वाटतो. डॉ. देवानंद सोनटक्केसमीक्षक, (नेमाडेंंच्या कादंबऱ्यांचे अभ्यासक)----------------मराठी साहित्यासाठी अभिमानाची बाब नेमाडे यांना ज्ञानपीठ सन्मान लाभणे हा मराठी साहित्यासाठी आणि संस्कृतीसाठी अभिमानाचा विषय आहे. त्यांनी एकूणच मराठी साहित्याची दृष्टी बदविण्याचे काम लेखनातून केले. देशीयतेचे भान त्यांनी दिल्याने संत तुकाराम आणि संत चक्रधर स्वामी यांच्याकडे पाहण्याची आपली नजरच बदलली. कवी म्हणून त्यांनी केलेले काम फारच मोठे आहे. त्यांना हा सन्मान लाभणे सर्व मराठी वाचक, लेखकांचाही सन्मान आहे. डॉ. हेमंत खडकेसाहित्य समीक्षक