शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

अमरसिंह अन्य पक्षात जाण्यासाठी तयार

By admin | Updated: February 25, 2017 00:25 IST

अन्य राजकीय पक्षात जाण्यासाठी आपण चांगली संधी शोधत आहोत, असे सांगत अमरसिंह यांनी आपल्या भावी वाटचालीचे संकेत दिले

नवी दिल्ली : अन्य राजकीय पक्षात जाण्यासाठी आपण चांगली संधी शोधत आहोत, असे सांगत अमरसिंह यांनी आपल्या भावी वाटचालीचे संकेत दिले. अमरसिंह यांना समाजवादी पक्षातून काढून टाकण्यात आलेले आहे. समाजवादी पक्षात पुन्हा परतणार नाही, असेही त्यांनी शुक्रवारी येथे स्पष्ट केले. अमरसिंह हे कुठल्याही राजकीय पक्षाशी संलग्न नसल्याचे राज्यसभेच्या सचिवालयाने अलिकडेच स्पष्ट केले आहे.या पार्श्वभूमीवर अमरसिंह यांनी हे मत व्यक्त केले. चांगली संधी म्हणजे नेमके काय? असे विचारले असता ते म्हणाले की, हा निर्णय घाईगडबडीत नसेल. जुने अनुभव गाठीशी असल्याने विचारपूर्वक निर्णय घेऊ. अमरसिंह म्हणाले की, मला दोन वेळा सपातून काढण्यात आले. आता पुन्हा या पक्षात परतणार नाही. राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणार का? असे विचारले असता ते म्हणाले की, मी का राजीनामा देऊ. मला मुलायम सिंह यांनी सदस्यत्व दिले आहे. जर पक्षाचे अध्यक्ष असताना त्यांनी मला राजीनामा देण्यास सांगितले असते तर मी खुशीने राजीनामा दिला असता.  भाजपात सहभागी होण्यासाठी आपण कोणत्याही नेत्यासोबत चर्चा केलेली नाही, असे सांगून अमरसिंह म्हणाले की, माझ्या मनात गांधी कुटुंबाबाबत कोणतीच कटुता नाही. पण, कॅश फॉर व्होटप्रकरणानंतर तुरुंगात जे अत्याचार मी सहन केले आहेत ते विसरू शकत नाही. तेथे मला प्लास्टिकच्या तांब्यातून पाणी प्यावे लागत होते. त्यामुळे काँग्रेसमध्येही अमरसिंह येतील याची शक्यता वाटत नाही.