शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

पंजाबमध्ये अमरिंदरच कॅप्टन!

By admin | Updated: March 12, 2017 01:02 IST

पंजाबमध्ये सत्तारूढ शिरोमणी अकाली दल आणि त्यांचा सहकारी भाजपाच्या काही कॅबिनेट मंत्र्यांसह अनेक मोठ्या नेत्यांना पराभवाचा धक्का बसला आहे.

चंदीगढ : पंजाबमध्ये सत्तारूढ शिरोमणी अकाली दल आणि त्यांचा सहकारी भाजपाच्या काही कॅबिनेट मंत्र्यांसह अनेक मोठ्या नेत्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. काँग्रेसने येथे मोठा विजय मिळवत सत्तेत पुनरागमन केले आहे आणि अमरिंदर सिंग हेच खऱ्या अर्थाने पंजाबचे कॅप्टन असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यात आम आदमी पार्टी दुसऱ्या स्थानी आणि आतापर्यंत सत्तेत असलेली अकाली दल - भाजपा यांची आघाडी तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली. बादल यांच्या घराणेशाहीलाही तेथील मतदारांनी नाकारले आहे. पंजाबला बर्बाद करणाऱ्यांना हाकललेअत्यंत वाईट दशा करून पंजाबला बर्बाद करणाऱ्या शिरोमणी अकाली दलाची सत्ता उलथवून काँग्रेसच्या हाती सत्ता देणाऱ्या पंजाबच्या जनतेला धन्यवाद देत प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी अमलीपदार्थाच्या व्यसनातून मुक्त करण्याचा ठाम शब्द दिला. चार आठवड्यांतच ही समस्या निकाली काढली जाईल. या समाजघातकी अवैध धंद्यातील लोकांवर कठोर कारवाई केली जाईल. धार्मिक ग्रंथाच्या अवमान करण्यात आल्याच्या घटनांची चौकशी केली जाईल. आम आदमी पार्टीलाही जवळ फटकू न देण्याचे शहाणपण दाखविणाऱ्या पंजाबच्या जनतेची त्यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली. केजरीवालांसारख्या वावटळी येतात आणि जातात, असे ते म्हणाले.निवडणुकीआधी काँग्रेसमध्ये सामील झालेले नवजोत सिंग सिद्धू यांना उपमुख्यमंत्री करणार का? यावर कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले की, सोनिया गांधी सध्या विदेशात आहेत. त्यामुळे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हेच याबाबतीत निर्णय घेतील. आम्ही आमच्या वतीने शिफारस करणार आहोत; परंतु, अंतिम निर्णय राहुलजी हेच घेतील. पंजाब काँग्रेस विधिमंडळ पक्षाची उद्या, रविवारी बैठक बोलावण्यात आल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.