नवी दिल्ली : राजीव गांधी यांच्या दिल्ली निवासस्थानी लिट्टेचा गुप्तहेर आश्रयाला होता काय? त्याने राजीव गांधी यांची स्फोटात हत्या होण्यापूर्वी इत्थंभूत माहिती पुरविली काय, हा तपासाचा नवा दृष्टिकोन माजी केंद्रीय गृहसचिव राम प्रधान यांच्या ‘माय इअर्स विथ राजीव अॅण्ड सोनिया’ या पुस्तकातून समोर आला आहे.
राजीव गांधी हत्याकांडाचा तपास वर्मा आणि जैन आयोगांकडून करण्यात आला आहे. या तपासाला नवे वळण देऊ शकेल, असा हा खुलासा मानला जातो. लिट्टेचा गुप्तहेर 1क् जनपथ या निवासस्थानी आश्रयाला असावा याबाबत माङया मनात कोणतीही शंका नाही, असे प्रधान यांनी म्हटले आहे. राजीव गांधी यांच्या सरकारच्या काळात प्रधान हे केंद्रीय गृहसचिव आणि नंतर अरुणाचलचे राज्यपाल बनले होते. आसाम आणि मिझोरमच्या करारात त्यांनी महत्त्वाचे भूमिका बजावली होती.
सोनियांनाही तसेच वाटते - लेखकाचा दावा
सत्य नि:संशय बाहेर आले असे मला वाटत नाही. त्या वेळी 1991च्या लोकसभा निवडणुकीच्या काळात सोनिया गांधी पूर्णवेळ अमेठीत होत्या. कुणीतरी आतमधील व्यक्ती 1क् जनपथमधील महत्त्वाची माहिती गुप्तहेरांना पुरवत असावी, अशीच त्यांचीही भावना असावी असे मला वाटते, असा दावाही प्रधान यांनी केला आहे. न्या. वर्मा आयोगाने राजीव गांधी यांच्या हत्याकांडाला कारणीभूत ठरलेल्या सुरक्षेतील त्रुटींचा तपास केला आहे. जैन आयोगाने सुरक्षेसह अन्य बाबींच्या अनुषंगाने तपास केला.