शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

जयललितांचे भाचे पनीरसेल्वमच्या बाजूने

By admin | Updated: February 25, 2017 00:37 IST

तामिळनाडूच्या राजकीय नाट्यात शुक्रवारी नव्या अंकाची भर पडली. जयललिता यांच्या जयंतीच्या दिवशीच त्यांचे भाचे दीपक जयकुमार यांनी माजी मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांची बाजू घेत

चेन्नई : तामिळनाडूच्या राजकीय नाट्यात शुक्रवारी नव्या अंकाची भर पडली. जयललिता यांच्या जयंतीच्या दिवशीच त्यांचे भाचे दीपक जयकुमार यांनी माजी मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांची बाजू घेत सरचिटणीस शशिकला यांना जाहीर विरोध केला आहे. गेल्या आठवड्यापर्यंत शशिकला यांच्या गटाचे जाणारे जयकुमार यांनी ही भूमिका घेतल्याने शशिकला यांच्यासाठी हा मोठा धक्का समजला जात आहे.न्यायालयाने जयललिता यांना भरण्यास सांगितलेला शंभर कोटी रुपयांचा दंड भरण्याची तयारीही दीपक जयकुमार यांनी दर्शविली आहे. तर, पक्षाची एकजूट कायम राखण्यासाठी ओ. पनीरसेल्वम यांच्याकडे नेतृत्व द्यायला हवे, असेही ते म्हणाले. जयललिता यांची भाची दीपा जयकुमार या सुरुवातीपासून शशिकला यांच्या विरोधात आणि पनीरसेल्वम यांच्या बाजूने उभ्या आहेत. दीपक जयकुमार म्हणाले की, दिनकरन यांची पक्षाच्या उप महासचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. पण, ते या पदासाठी पात्र नाहीत. दिनकरन यांना जयललिता यांनी खासदार केले होते. पण, नंतर त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले होते. २०११ मध्ये जयललिता यांनी १४ जणांना पक्षातून काढून टाकले होते. नंतर शशिकला यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर २०१२ मध्ये फक्त शशिकला यांना पुन्हा पक्षात घेण्यात आले. मात्र तुरुंगात जाण्याआधी १५ फेब्रुवारी रोजी शशिकला यांनी दिनकरन यांना पुन्हा पक्षात प्रवेश दिला आहे. दिनकरन हे शशिकला यांचे नातेवाईक आहेत. माजी मुख्यमंत्री ओ. पी. पनीरसेल्वम, ई. मधुसूदनन आणि सी. पोन्नायन यांच्यासारख्या नेत्यांची पक्षाला गरज आहे, असे सांगून ते म्हणाले की, पनीरसेल्वम यांना दिनकरन यांचे पद (उप महासचिव) दिले जावे. (वृत्तसंस्था)अण्णाद्रमुक पक्ष एका कुटुंबाच्या हातात गेला आहे. जयललिता यांनी ज्यांना पोएस गार्डनमधून बाहेर काढले होते त्यांच्याकडून पक्ष परत आणू. हे धर्मयुद्ध आहे. यात न्यायाचा विजय होईल, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांनी नाव न घेता शशिकला यांना पुन्हा लक्ष्य केले. अम्मांच्या भाचीची नवी राजकीय संघटनामुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांची भाची दीपा जयकुमार यांनी शुक्रवारी ‘एमजीआर अम्मा दीपा पेरावाई’ या राजकीय संघटनेची मुहूर्तमेढ रोवून तामिळ राजकारणात उतरण्याचे संकेत दिले. जयललिता यांच्या जयंतीदिनी त्यांनी स्वतंत्र संघटना स्थापन केली. ‘माझा राजकारणातील प्रवास आजपासून सुरू झाला’, असे त्या म्हणाल्या. ‘वेद निलयम’ आमच्या नावावर जयललिता यांनी त्यांची संपत्ती आपल्या व बहीण दीपा यांच्या नावावर केलेली आहे. यात त्यांच्या पोएस गार्डन स्थित वेद निलयम या बंगल्याचाही समावेश आहे, असे दीपक जयकुमार यांनी सांगितले. जयललिता यांच्यावर उपचार सुरू असताना ६२ दिवस आपण हॉस्पिटलमध्ये होतो, असेही ते म्हणाले.