शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींकडून आघाडीचे संकेत

By admin | Updated: November 17, 2015 02:59 IST

राजकीय पक्षांसाठी ‘एकला चलो’चा नारा आता भूतकाळात जमा असल्याचे सूचित करीत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी विविध राज्यांतील निवडणुकांमध्ये युती किंवा

- हरीश गुप्ता,  नवी दिल्लीराजकीय पक्षांसाठी ‘एकला चलो’चा नारा आता भूतकाळात जमा असल्याचे सूचित करीत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी विविध राज्यांतील निवडणुकांमध्ये युती किंवा आघाडीचे राजकारण यशस्वी करण्यासाठी मैलांची वाटचाल करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. बिहारमध्ये अलीकडेच महाआघाडीत सहभागी झालेल्या काँग्रेसला मिळालेल्या भरघोस यशामुळे आत्मविश्वास दुणावलेल्या राहुल गांधी यांनी ‘भूतकाळ मी मागे सोडला आहे’, असे ठामपणे एका उत्तरात सांगितले. आघाडी किंवा युती स्थापन करण्याबाबत तुम्ही फारसे उत्सुक दिसत नाही, असा थेट प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता.‘एकला चलो रे’च्या राजकारणापासून पूर्णपणे फारकत घेणार असल्याचे संकेत देताना त्यांनी विधानसभा निवडणुकीत समविचारी आणि धर्मनिरपेक्ष पक्षांशी युती करण्याची इच्छा व्यक्त केली. आसाम आणि प. बंगालमध्ये पुढील वर्षी मे- जूनमध्ये विधानसभा निवडणुका असल्याकडे लक्ष वेधण्यात आले असता त्यांनी कोणत्याही राज्यात आघाडी किंवा युतीचे उद्दिष्ट साध्य होऊ शकते. तशी शक्यता मी नाकारणार नाही, असे स्पष्ट केले.काँग्रेसने याआधीच प. बंगालमध्ये डाव्या पक्षांसोबत समन्वय राखण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, तर आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी युती करणार असल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. बद्रुद्दीन अजमल यांच्या आॅल इंडिया युनायटेड डेमॉक्रॅटिक फ्रंटचे लोकसभेत तीन खासदार असून त्यांच्याशी युती करण्याचे संकेतही त्यांनी दिले.संघटनात्मक बदल नाही...राहुल गांधी यांची पक्षाध्यक्षपदी तख्तपोशी आणि काँग्रेसमधील संघटनात्मक बदलाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. सप्टेंबरमध्येच हे बदल होऊ घातले होते. हे बदल लवकरच होतील मात्र फार मोठे किंवा व्यापक नसतील, असेही त्यांनी सूचित केले. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनीही २००४ मध्ये लोकसभा निवडणुकीत आघाडी स्थापन करीत अटलबिहारी वाजपेयी यांच्या ‘इंडिया शायनिंग’च्या नाऱ्यातील हवा काढून घेतली होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी डोळ्यासमोर ठेवत राहुल गांधी यांनीही तीच भाषा चालविली आहे.