शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

देशभरातील दिवाळीच्या धुमधडाक्याला दु:खाचे गालबोट

By admin | Updated: November 13, 2015 00:22 IST

बुधवारी देशभरात दिवाळीचा धुमधडाका सुरू असताना काही ठिकाणी आग आणि फटाखे फोडतानांच्या दुर्घटनांचे गालबोट लागले.

नवी दिल्ली : बुधवारी देशभरात दिवाळीचा धुमधडाका सुरू असताना काही ठिकाणी आग आणि फटाखे फोडतानांच्या दुर्घटनांचे गालबोट लागले. हैदराबादमध्ये फटाक्यांमुळे डोळ्यांना इजा होऊन ५० पेक्षा जास्त लोकांना रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल व्हावे लागले. दिवाळीचा आनंदोत्सव सुरू असताना बिहारच्या दोन जिल्ह्यांमध्ये झालेल्या संघर्षात तीन जण मृत्युमुखी पडले. दिल्लीत आगीसंबंधी २९० तर राजस्थानमध्ये ४० पेक्षा जास्त घटनांची नोंद झाली.दिल्लीत अग्निशामक दलाला सुमारे २९० फोन कॉल आले. त्यातील १२८ घटनांची नोंद मध्यरात्रीनंतर करण्यात आली. संध्याकाळी ६ ते ९ या काळात फटाके फोडण्याला वेग येत असताना आगीच्या अधिकाधिक घटनांमुळे अग्निशामक दलाची दमछाक झाली. दिल्लीतील ५६ अग्निशामक केंद्रांवर तसेच गर्दीच्या आणि बाजारपेठेच्या २० ठिकाणी अग्निशामक बंबांची खास व्यवस्था करण्यात आली होती. अग्निशामक दलातील ३ हजार जवानांपैकी १८०० जवान सेवेत दाखल होते. किमान १७५ ते १८० वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती.जखमींमध्ये मुलांची संख्या अधिकहैदराबादमध्ये फटाके फोडताना सावधगिरी न बाळण्याचा परिणाम ५० पेक्षा जास्त लोकांच्या डोळ्यांना दुखापत होण्यात झाला. त्यात मुलांची संख्या सर्वाधिक आहे. हैदराबादच्या एलव्ही प्रसाद संस्थेत तसेच सरोजिनी देवी नेत्री रुग्णालयात दाखल होणाऱ्यांमध्ये मुलांची संख्या ३० टक्के असल्याचे सूत्रांनी सांगितले. रॉकेट फोडताना दिशा बदलल्यामुळे अनेकांच्या डोळ्यांना फटका बसला. राजस्थानमध्ये फटाक्यांमुळे शंभरावर लोक जखमी झाले. आगीच्या ४० पेक्षा जास्त घटना घडल्या. जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात सुमारे २५० जणांवर उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये सर्व वयोगटातील लोकांचा समावेश असल्याचे या रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले. (वृत्तसंस्था)बिहारच्या नालंदा आणि नवादा जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी क्षुल्लक कारणांवरून झालेल्या संघर्षात तीन जणांना जीव गमावावा लागला. नालंदा जिल्ह्यातील राजगीर पोलीसठाण्यांतर्गत सिलाबबाजार भागात जुगार खेळणाऱ्या दोन गटांमध्ये झालेल्या भांडणावरून झालेल्या गोळीबारात दोघे ठार झाले. नवादा जिल्ह्यात जुगार खेळत असल्याची पोलिसांना माहिती देण्यात आल्यावरून झालेल्या संघर्षात एक ठार तर अन्य एक जण जखमी झाला.