शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गांधी हत्येसह महत्त्वाच्या सर्व फाईल्स सुरक्षित

By admin | Updated: July 15, 2014 02:03 IST

नरेंद्र मोदी सरकारकडून इतिहासाची हेळसांड होत नसल्याचा दावा करून गृहमंत्री राजनाथसिंग यांनी, म. गांधी यांच्या हत्येसह अन्य ऐतिहासिक महत्त्वाच्या फाईल्स सुरक्षित असल्याचा निर्वाळा आज राज्यसभेत दिला

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकारकडून इतिहासाची हेळसांड होत नसल्याचा दावा करून गृहमंत्री राजनाथसिंग यांनी, म. गांधी यांच्या हत्येसह अन्य ऐतिहासिक महत्त्वाच्या फाईल्स सुरक्षित असल्याचा निर्वाळा आज राज्यसभेत दिला. नरेंद्र मोदी यांनी फाईल्स नष्ट करण्याआधी त्यांचे डिजिटलीकरण करण्याचे निर्देश दिले असल्याचे स्पष्ट करून राजनाथसिंगांनी, फाईल्स नष्ट करण्याची प्रक्रिया संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्याच काळात सुरू झाल्याचेही नमूद केले. सरकार इतिहासाची निरंतरता कायम राखण्यासाठी कटिबद्ध असून त्यात कुठलीही हेळसांड केली जाणार नाही असा दावा त्यांनी केला. गृहमंत्रालयातील ज्या फाईल्स नष्ट करण्यात आल्या त्यांना कार्यालयाच्या प्रक्रिया नियमांनुसारच नष्ट केले गेले आहे, असे सिंग पुढे म्हणाले. या प्रक्रियेनुसार कार्यालयातील फाईल्सला तीन श्रेणीत विभागले जाते. तिसऱ्या श्रेणीतील फाईल्सला १० वर्षांच्या काळानंतर तिचे पूर्णपणे समीक्षण करून नष्ट केले जाते. राज्यसभेतील एका सदस्याने प्रसिद्धी माध्यमांनी दिलेल्या वृत्ताच्या आधारे मागील आठवड्यात, पंतप्रधानांच्या सूचनेनुसार दीड लाख फाईलींना नष्ट केल्याचे सांगून त्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येशी संबंधित फाईलही असल्याचे म्हटले होते. त्यानंतर गृहमंत्र्यांनी या कथनाचे खंडन करणारे एक स्पष्टीकरणही दिले होते. सदस्यांना हवे असेल तर नष्ट केलेल्या एकेका फाईलमधील मसुदा आपण काढून देऊ शकतो, असा दावाही सिंग यांनी पुढे केला आहे. नष्ट केलेल्या फाईल्सचे मायक्रो फिल्मिंग करण्याबाबत सरकारकडून कोणतीच सूचना आली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तोंडीच, फाईली नष्ट करण्याआधी त्यांचे स्कॅनिंग व मायक्रोफिल्मिंग केले जावे असे म्हटले असल्याचे सिंग यांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)