शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

भारतात राहणारे सर्व हिंदूच -भागवत

By admin | Updated: August 12, 2014 02:12 IST

ओडिशातील कटक येथे रविवारी एका कार्यक्रमात भागवत म्हणाले की, इंग्लंडमध्ये राहणाऱ्यांना इंग्रज, जर्मनीत राहणाऱ्यांना जर्मन, अमेरिकेच्या लोकांना अमेरिकन म्हटले जात असेल तर,

नवी दिल्ली : हिंदुस्तानात राहणाऱ्या सर्वांना हिंदू म्हटले जावे, असे विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले असून, त्यावर विविध पक्षांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदविली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जेडीयू, माकप, बसपा आदी पक्षांनी भागवत यांच्यावर टीकास्त्र सोडले असताना, भाजपा आणि शिवसेनेने भागवत यांच्या विधानाचे समर्थन केले.ओडिशातील कटक येथे रविवारी एका कार्यक्रमात भागवत म्हणाले की, इंग्लंडमध्ये राहणाऱ्यांना इंग्रज, जर्मनीत राहणाऱ्यांना जर्मन, अमेरिकेच्या लोकांना अमेरिकन म्हटले जात असेल तर, हिंदुस्तानातील लोकांना हिंदू का म्हटले जात नाही.दरम्यान, त्यांच्या या विधानावर प्रतिक्रिया नोंदवत विविध पक्षांनी वादात उडी घेतली आहे. भागवत यांना मी राज्यघटना वाचण्याचा सल्ला देतो. घटनेत इंडिया म्हणजे भारत असाच उल्लेख आहे. हिंदुस्तान असे कुठेही म्हटलेले नाही, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनीष तिवारी यांनी स्पष्ट केले. भागवत यांचा घटनेवर विश्वास आहे काय? ते स्पष्ट करावे, असा सवाल माकपचे सीताराम येचुरी यांनी केला. देशाने स्वातंत्र्यापासून घटनेवर विश्वास ठेवला आहे. भविष्यातही हा विश्वास कायम राहील, असे जेडीयूचे अध्यक्ष शरद यादव यांनी म्हटले. भागवत यांना भारतीय घटनेचे ज्ञान नाही. त्यांना ज्ञान असते तर त्यांनी असे म्हटले नसते, असा सल्ला बसपाच्या अध्यक्ष मायावती यांनी दिला. भागवत यांना हिंदू म्हणजे हिंदुस्तानी असे म्हणायचे होते. धार्मिक आधारावर हस्तक्षेप करण्याबाबत ते कधीही बोलले नाहीत, असे सांगत भाजपाचे नेते विनय कटियार यांनी भागवत यांचे समर्थन केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)