शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा, बसपची सर्व गणिते सपाने उधळली

By admin | Updated: January 21, 2017 05:14 IST

मुलायम सिंह यादव आणि त्यांचे चिरंजीव अखिलेश यादव अर्थात टिपू यांनी निवडणुकीच्या पहिल्या फेरीत तरी जोरदार धक्का दिला

व्यंकटेश केसरी,

नवी दिल्ली- आपले मुख्य विरोधक भारतीय जनता पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांना उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत नेताजी मुलायम सिंह यादव आणि त्यांचे चिरंजीव अखिलेश यादव अर्थात टिपू यांनी निवडणुकीच्या पहिल्या फेरीत तरी जोरदार धक्का दिला आहे. मुलायम यांनी मुलापुढे शरणागती पत्करली, असे चित्र दिसत असले तरी पिता-पुत्रांनी आपापसातील संघर्षाचा फायदा विरोधकांना मिळवून दिला नाही. किंबहुना राज्यातील जनतेची सहानुभूतीच मिळवली.सत्ताधारी पक्षाच्याविरोधात मतदारांत असलेली कथित नाराजी या दोघांनी सहानुभूतीमध्ये बदलून घेतली आहे. यासाठीची कृती त्यांनी विदेशी कंपनीने लिहिलेल्या पटकथेप्रमाणे केली व त्यात त्यांना यश आले. समाजवादी पक्षात जो जोरदार संघर्ष उफाळून आला होता, त्याचा लाभ घेण्यात भाजपा व बसपा यांना अपयश आले आहे. मोदी व मायावती यांना यादव कुटुंबातील भांडणाचा लाभ घेता आला नाही. पण अखिलेश यांना मुलायमसिंह यादव यांच्या मार्गदर्शनाखाली नेता व समाजवादी पक्षाचा सर्वोच्च नेता बनविले. मुलायमसिंह यादव यांनी या भांडणात कुटुंब अखंड ठेवले व आता तर ते उघडपणे अखिलेशला आशीर्वाद देत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मोदी हे सर्जिकल स्ट्राईक्स आणि काळ््या पैशांच्याविरोधात उपाय म्हणून नोटाबंदीच्या निर्णयाचा वापर करण्याची अपेक्षा असताना समाजवादी पक्षाने प्रचारयुद्ध तर जिंकले आहे. >काँग्रेसला धक्काअखिलेश यादव यांनी २00 उमेदवारांची यादी जाहीर केल्यामुळे काँग्रेसला धक्काच बसला आहे. सपाने एकतर्फी यादी जाहीर करणे काँग्रेसला आवडलेले नाही. आघाडीची बोलणी सुरू होण्याआधीच सपाने आपल्या मतदारसंघांवर उमेदवार घोषित केले, अशी काँग्रेसची तक्रार आहे.